shirsath 12.png 
नाशिक

पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिन्नर : शिरसाठ यांचे मुसळगावपासून दीड किलोमीटर अंतरावर दुसरं एक शेत असून, तेथे त्यांचा पोल्ट्री फार्म आहे. रविवारी सकाळी अकराला हृषीकेश नेहमीप्रमाणे शेतात गेला. मात्र अकरानंतर तो दिसला नाही म्हणून त्याच्या चुलत भावाने पोल्ट्री फार्मजवळच्या खोलीत फटीतून पाहिले असता त्याला धक्काच बसला..

अशी घडली घटना

सिन्नर तालुक्‍यातील मुसळगाव येथील युवकाने आपल्या शेतातील पोल्ट्री फार्मजवळच्या खोलीत रविवारी (ता. 3) दुपारी दोन ते अडीचच्या दरम्यान गळफास घेत आत्महत्या केली. हृषीकेश बाबासाहेब शिरसाठ (वय 21) असे युवकाचे नाव असून, त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. शिरसाठ यांचे मुसळगावपासून दीड किलोमीटर अंतरावर दुसरं एक शेत असून, तेथे त्यांचा पोल्ट्री फार्म आहे. रविवारी सकाळी अकराला हृषीकेश नेहमीप्रमाणे शेतात गेला. मात्र अकरानंतर तो दिसला नाही म्हणून त्याच्या चुलत भावाने पोल्ट्री फार्मजवळच्या खोलीत फटीतून पाहिले असता त्याला हृषीकेशने पत्र्याच्या लोखंडी नळीला गळफास घेतल्याचे दिसले. त्याने तातडीने पोलिस पाटलाला फोन करून सांगितले. एमआयडीसी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. हृषीकेशच्या घरची परिस्थिती चांगली होती. मोठ्या भावाचे नुकतेच लग्न ठरले असून, भाऊ व आईसोबत तो राहात होता. त्याच्या अचानक आत्महत्येचा शोध पोलिस घेत आहेत.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ 2nd Test Weather Update: भारत-न्यूझीलंड मॅच पाहण्यासाठी पहाटे उठण्यापूर्वी हे नक्की वाचा... Christchurch मधून Live अपडेट्स; नेमकं काय घडणार?

प्रत्येक शॉटआधी २० लिटर दूध अन् गुलाबाच्या पाकळ्यांनी अंघोळ? रवि किशन यांनी सांगितला सेटवरचा किस्सा!

H-1B Visa: IBM चा भारतीय कर्मचाऱ्यांना मोठा धक्का; एक तर अमेरिका सोडा किंवा नोकरी सोडा!

Latest Marathi News Live Update: सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत 84.36% मतदान

Vedant Sehwag 7 Wickets: वीरूच्या लेकाने घेतल्या ७ विकेट्स! वेदांत सेहवागच्या माऱ्यासमोर भलेभले गार; आर्यवीरने टोलावले ३ चौकार, २ षटकार

SCROLL FOR NEXT