Death
Death esakal
नाशिक

Nashik News: ऑक्सिजन प्रेशर लावून युवकाची आत्महत्या; नाशिकरोडच्या लॉजमधील घटना

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : नाशिकरोड परिसरातील लॉजमध्ये आलेल्या युवकाचा मृतदेह रुममध्ये ऑक्सिजन मास्क व सिलेंडर लावलेल्या स्थितीत आढळून आला आहे.

त्याने रुममध्ये ऑक्सिजनचा प्रेशर वाढवून आत्महत्त्या केल्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली आहे. (Youth committed suicide by applying oxygen pressure Incidents at Nashik Road Lodge Nashik News)

सूरज विजय साेनवणे (२१, रा. भऊर, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) असे मयत युवकाचे नाव आहे. सूरज हा गेल्या शनिवारी (ता.२८) पहाटे साडेपाच वाजता नाशिकराेड येथील मद्रास कॅफेच्या वर असलेल्या पूर्वा लॉज येथे आला.

लाॅजच्या काऊंटवर एक दिवसाच्या मुक्कामासाठी ५०८ नंबरचा रुम बुक केला. लॉजच्या नियमाप्रमाणे कर्मचारी करुणाकर दास हा रविवारी (ता.२९) सकाळी बारा वाजता तो चेक आउट करण्यासठी गेला असता, त्यावेळी सूरजने दरवाजा उघडला नाही.

आतून प्रतिसाद येत नसल्याने त्याच्या मोबाईलवर फोनही केला. तरीही दरवाजा न उघडल्याने त्यांनी नाशिकरोड पाेलिसांशी संपर्क साधला. पाेलिसांनी लॉजवर पाेहाेचले असता त्यांनी रूमचा दरवाजा तोडला व आत पाहिले असता सूरज हा बेडखाली पालथा पडलेल्या अवस्थेत होता.

त्याच्या ताेंडाला ऑक्सिजनचा मास्क व नाका तोंडात रक्त साखाळल्याचे दिसून आले. तसेच बाजूलाच एक ऑक्सिजन सिलेंडरही आढळून आले. त्यामुळे त्याने ऑक्सिजन प्रेशर शरीरात साेडून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त होतो आहे.

दरम्यान, त्याचा मृत्यू कसा झाला यासह चाैकशीसाठी संबंधित लाॅजचालक व स्टाफची पोलीस चौकशी करीत आहेत. त्याने ऑक्सिजन मास्क व सिलेंडर कुठून व का आणले, याचा तपास सुरु केल्याची माहिती नाशिकराेड पाेलिस ठाण्याचे वरिष्ठ पाेलिस निरीक्षक रामदास शेळके यांनी दिली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : दोघांचा जीव घेणाऱ्याला 'अशी' शिक्षा; वाहतूक जागृतीचे फलक रंगवायचे, तीनशे शब्दांचा निबंध लिहायचा अन्...

IPL 2024 RR vs KKR: कोलकाता-राजस्थान सामन्यावर फिरलं पावसाचं पाणी, सामना करावा लागला रद्द

Pune: नुकतीच 12 वी झालेली, पार्टीसाठी बिल्डर वडिलांची आलिशान गाडी घेतली अन्...; आरोपी तरुणाचा प्रताप समोर

SRH vs PBKS: पंजाबचा शेवटच्या मॅचसाठी ऐतिहासिक निर्णय! आजपर्यंत कोणत्याच संघानं न केलेली गोष्ट करत रचला इतिहास

काय सांगता! एकाच व्यक्तीने केलं 8 वेळा मतदान; व्हिडिओ शेअर करत विरोधकांनी केलाय दावा

SCROLL FOR NEXT