death  esakal
नाशिक

Nashik News : वैतरणा धरणात तरुणाचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : वैतरणा धरणात अंघोळीसाठी गेलेल्या तरुणाला धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने त्याचा बुडून मृत्यू झाला. शुक्रवार (ता.५) नाशिक शहरातील पाथर्डी फाटा येथील पाच तरुण मित्र वैतरणा धरण परिसरातील आळवंडी येथे मुक्कामी आले होते. (Youth drowned in Vaitarna Dam nashik news)

त्यांनी त्या ठिकाणी टेंट लावून रात्री मुक्काम केला. सकाळी सात वाजेच्या सुमारास हे सर्व तरुण वैतरणा धरणावर अंघोळ करण्यासाठी गेले. त्यातील अरुण जगदीश जाधव (वय २०, राहणार पाथर्डी फाटा) याला धरणातील पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

या घटनेची माहिती मिळताच स्थानिक तरुणांनी त्याचा शोध घेऊन बाहेर काढले. पुढील उपचारासाठी त्यास घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. डॉक्टरांनी त्यास तपासून मृत घोषित केले. घोटी पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सहायक पोलीस निरीक्षक दिलीप खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार बिपीन जगताप पुढील तपास करीत आहेत.

अरुण जगदीश जाधव हा गुरुगोविंद सिंग अभियांत्रिकी महाविद्यालयात सिव्हिल इंजिनिअरिंग च्या पहिल्या वर्षाचा विद्यार्थी होता. आज महाविद्यालयात ही बातमी कळल्यानंतर संस्थेतर्फे, विद्यार्थी आणि शिक्षकांनी त्याला श्रद्धांजली वाहिली. जाधव कुटुंब मूळचे बिजापूर (कर्नाटक) येथील होते.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

अरुणच्या जन्मापासून हे कुटुंब पाथर्डी फाटा येथील नरहरी नगर भागात असलेल्या गोविंदा हाईट्स या इमारतीत राहतात. भाऊ अर्जुन देखील शिक्षण घेत असून वडील बांधकाम व्यावसायिक आहेत. भविष्यात वडिलांच्या व्यवसायात सहभागी होण्यासाठी त्याने सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला होता.

जाधव कुटुंब शांत आणि मनमिळाऊ म्हणून परिचित असल्याने ही घटना कळल्यानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत होती. दुपारी शोकाकूल वातावरणात अंत्यविधीसाठी हे कुटुंब त्यांच्या मूळगावी गेले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Sonawane : पुस्तकी ज्ञानापलीकडची शाळा! अशोक सोनवणे गुरुजींनी घडविले ३००० हून अधिक बालकलाकार

Satara News: पत्नीच्या डिलिव्हरीसाठी येताच काळाचा घाला, ८ तासांची चिमुकली पित्याच्या अंत्यदर्शनासाठी | Sakal News

Pune News: इमारतीवरून तोल गेल्याने मुलाचा मृत्यू; पतंग उडविताना कात्रजमध्ये घटना, बांधकाम व्यावसायिकावर गुन्हा!

Solapur University: शॉकिंग अपडेट! पुण्यश्लोक होळकर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना उच्च रक्तदाब; संशोधनातील आकडे पाहून थक्क व्हाल

Crime News : नोटाबंदीनंतरही ४०० कोटींच्या जुन्या नोटा? घोटी पोलीस तपासात धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT