Spectacular view of the temple in the fog. In the second picture, the waterfalls falling in the ghat and the youth enjoying themselves. esakal
नाशिक

Monsoon Tourism: काय तो वणीचा डोंगर, काय ते धबधबे, काय ती झाडी! गडावरील निसर्गसौंदर्याची तरुणाईला भुरळ

भक्तिमय व निसर्गरम्य दुहेरी वातावरणाचा मिलाप

दिगंबर पाटोळे

Monsoon Tourism : सह्याद्रीच्या पर्वताच्या पूर्व-पश्चिम पर्वतरांगेत समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार ६०० उंचीवर असलेला सप्तश्रृंगगड हिरव्यागार भरजरी शालूने नटला असून, बहरलेल्या निसर्गसौंदर्याची भाविकांबरोबरच तरुणाईला भुरळ पडत असून, ‘काय तो डोंगर, काय ते धुके, काय ती झाडी अन् काय ते धबधबे’ असे म्हणत भाविक व पर्यटक आदिमाया भगवतीच्या सानिध्यात निसर्गसौंदर्याचा मनमुराद आनंद लुटत आहेत. (youth fascinated by natural beauty of saptashrungi fort in monsoon nashik)

जून महिन्यात पावसाने पाठ फिरविल्यानंतर जुलैपासून सह्याद्रीच्या पूर्व-पश्चिम रांगेत मॉन्सून खऱ्या अर्थाने सक्रिय झाला आहे. गडावर कमी-अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे निसर्ग खुलून गेला आहे.

गडावरील दऱ्याखोऱ्यांतील छोटे-मोठे धबधबे प्रवाहित झाले आहे. त्यातच बहरलेल्या वृक्षवेली, उमलले रानफुले, दाट धुक्याची झालर यामुळे गडावरील सृष्टीसौंदर्य पर्यटकांबरोबरच भाविकांनाही मोहित करीत आहे. त्यामुळे भक्तिमय व निसर्गरम्य असा दुहेरी वातावरणाच्या मिलापाचा आनंद लुटण्यासाठी तरुणाई सरसावली आहे.

दरम्यान, गडाच्या घाट रस्त्यावर कोसळणारे धबधब्याबरोबर लहान-मोठे दगड येत असल्यामुळे भाविक व पर्यटकांनी दुरूनच आनंद घ्यावा. घाट रस्त्यावर व पठारी भागात दाट धुके असल्याने भाविकांनी आपले वाहने सावकाश चालवण्याची काळजी घेणे आवश्यक आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नांदुरी-सप्तशृंगगड या घाट रस्त्यात यूटर्न ते धबधबा यादरम्यान छोट्या-मोठ्या दरडी पडल्याच्या घटना होत असल्याने या भागात वाहने घाटात थांबवू नये, याबाबतच्या सूचना सार्वजनिक बांधकाम विभाग, सप्तश्रृंगीदेवी न्यास व ग्रामपंचायतीने दिल्या आहेत.

भाविक व पर्यटकांनी प्रदक्षिणा मार्गावर न जाण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. तसेच सप्तशृंगगड घाट रस्त्यावरील धबधब्यावर भाविक व पर्यटक आवर्जून थांबून धबधब्याखाली भिजण्याचा, तसेच सेल्फी काढण्यासाठी गर्दी करतात.

या ठिकाणी पर्यटक व भाविकांना सुरक्षतेच्या दृष्टीने अटकाव करण्यासाठी, तसेच रस्त्यावरच वाहने पार्क केले जात असल्यामुळे अपघाताची शक्यता गृहीत धरून सार्वजनिक बांधकाम विभाग, वन विभागाने गर्दीच्या वेळेस सुरक्षा कर्मचारी नेमन्याची आवश्यकता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Tendulkar: विनोद कांबळी सचिनपेक्षा खरंच भारी होता? भावानेच केला खुलासा; म्हणाला, 'तो असं कधीच...'

Dr. Trupti Agarwal: 'मुलं म्हणजे रिपोर्ट कार्ड नव्हे,' डॉ. त्रुप्ती अगरवाल यांचं नवं शैक्षणिक सूत्र

ST Bus conductor drunk : एसटी बसचा कंडक्टर दारूच्या नशेत धुंद; केबिनजवळ जाताच ड्रायव्हरनं...; पाहा VIDEO

Rain-Maharashtra Latest Live News Update: मुंबई-पुणे महामार्गावरील बोर घाटात अवजड वाहनांना बंदी

Kavthe Yamai Crime : ऊसाच्या शेतात एका शेतकऱ्याचा मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ; पोलिसांना खुनाचा संशय

SCROLL FOR NEXT