death  esakal
नाशिक

Nashik Crime News : मारहाणीत जखमी युवकाचा उपचार सुरू असताना मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : गेल्या ८ एप्रिलला सापडलेला मोबाईल परत देण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय युवकास बेदम मारहाणीचा प्रकार घडला होता. त्यावर रुग्णालयात उपचार सुरु असताना रविवारी (ता. २३) वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले.

त्यामुळे या प्रकरणी संशयीतांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (youth injured in beating dies while undergoing treatment Nashik Crime News )

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

नितीन गणपत जाधव (वय ३०) असे मृत युवकाचे नाव आहे. त्याला ७ एप्रिलला एक मोबाईल सापडला होता. तो परत घेण्यासाठी दुसऱ्या दिवशी सकाळी अकराला सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात आलेल्या निलेश दिनकर ठोके (वय ३३, रा. कामाठवाडे), प्रसाद शिरीष मुळे व अन्य एका साथीदाराने नितीनला लोखंडी रॉडच्या सहाय्याने जबर मारहाण केली होती.

‘तू माझ्या पत्नीस फोन का करतो’ या कारणाहून ही मारहाण करण्यात आली होती. त्यात गंभीर जखमी झाल्याने नितीनवर रुग्णालयात उपचार सुरु होते. तर, नितीनचे वडील गणपत जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार अंबड पोलीस ठाण्यात जबर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

रविवारी नितीनचा मृत्यू झाल्याने संशयितांविरूद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित निलेश ठोके व प्रसाद मुळे यांना अटक केली असून, पोलीस उपनिरीक्षक सुनील बिडकर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Citizen Participation Budget: पुणे महापालिकेचा लोकाभिमुख अर्थसंकल्प: नागरिकांना ३१ ऑगस्टपर्यंत ऑनलाइन विकासकामे सुचविण्याची संधी

Pune Road Safety: राजाबहादूर मील रस्त्यावर बिल्डरची मुजोरी कायम; चिखलामुळे अपघात, महापालिकेचा दंड व काम थांबवण्याचा इशारा

Agni 4 missile: 'डीआरडीओ'कडून 'अग्नी-4' ची यशस्वी चाचणी, तब्बल चार हजार किलोमीटरपर्यंतचे लक्ष्य भेदणार!

''Gen Z सगळ्यात प्रामाणिक पिढी, सरकारने आधीच बोलणी करायला पाहिजे होती'', सरसंघचालक मोहन भागवत नेमकं काय म्हणाले?

Pune civic roads issue: पुण्यात खड्ड्यांचा मारा कायम; महापौरांचा ‘यंदा खड्डे कमी’ दावा, स्थायी समिती अध्यक्षांनी शहरात भरपूर खड्डे असल्याचे मान्य

SCROLL FOR NEXT