police lockdown malegaon.jpg 
नाशिक

जिल्हाबंदी असूनही मुंबई-पुण्यातील युवक शहरात शिरलेच कसे? प्रशासनाकडून अद्यापही खुलासा नाहीच!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : मुंबई-पुणे येथून आलेल्या युवकांमुळे जुने नाशिकमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. पोलिसांनी दोघांची माहिती घेत खबरदारी म्हणून एकास डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल केले. तर दुसऱ्यास होम क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. जिल्हाबंदी करण्यात आली असताना दोघे युवक नाशिकमध्ये कसे दाखल झाले, याबाबत प्रशासनाकडून खुलासा करण्यात आलेला नाही. 

जिल्हाबंदीतही मुंबई-पुण्यातील दोन युवक शहरात 

कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण आहे. शहर-जिल्ह्यातील कोरोनाबांधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात जुने नाशिकमधील चव्हाटा आणि खडकाळी भागात पुणे आणि मुंबईतून प्रत्येकी एक युवक आल्याच्या माहितीने परिसरात खळबळ उडाली. रहिवाशांमध्येही भीतीचे वातावरण पसरले. याबाबत त्यांनी भद्रकाली पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत चौकशी केली. खडकाळी येथे आलेला युवक मुंबई येथून आलेला आहे. त्याची मुंबई येथे तपासणी करण्यात आली होती. तपासणी अहवाल निगेटिव्ह आला आहे. परंतु खबरदारी म्हणून त्यास होम क्‍वारंटाइन करण्यात आले आहे. त्यांच्या हातावर तसा शिक्काही मारण्यात आला आहे.

हेही वाचा > एक सुशिक्षित डॉक्टर अन् तान्ह्या जुळ्या मुलांची आई आणि आत्महत्या??? गूढ काय?
 एक होम क्‍वारंटाइन, तर दुसरा डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात दाखल 

चौकशीनंतर पोलिसांनी त्यास घरात राहण्याच्या सूचना दिल्या. चार दिवसांपासून तो येथील नातेवाइकांच्या घरात लपून होता. तर चव्हाटा येथील युवक पुणे येथून आलेला आहे. तो मूळ चव्हाटा येथील राहणार आहे. नोकरीसाठी पुणे येथे होतो. शनिवारी (ता. 18) तो घरी आल्याचे परिसरातील रहिवाशांच्या लक्षात आले. त्यांनी त्याची तपासणी करण्याची मागणी केली. कुटुंबीयांनी त्यास डॉ. झाकिर हुसेन रुग्णालयात तपासणीसाठी पाठवले. त्याचा स्वॅब पाठविण्यात आला असून, अहवाल प्रलंबित आहे. 

Submitted by Sakal_Nashik on Sun, 04/19/2020 - 12:47

Desktop Headline:

video : 'जमावाच्या हल्ल्यात पोलिस वाचले; फक्त महंत कसे मारले गेले?'...साधू-महंतांना घातपाताचा संशय

Desktop Body: 

नाशिक : लॉकडाउनच्या काळात तीन प्रवाशांना जमावाने ठार केल्याचा पालघर जिल्ह्यातील प्रकार सकृतदर्शनी गावात दरोडेखोर आल्याच्या गैरसमजातून घडल्याचे पुढे येत असले, तरी साधू-महंतांसह त्र्यंबकेश्‍वर परिसरात मात्र हे पचनी पडायला तयार नाही. पोलिसांसह सगळे वाचतात. सुखरूप पळून जातात. फक्त महंतांसह तिघांचे जीव जातात कसे? असा संशय घेत याप्रकरणी "लॉकडाउन' चौकशीसाठी एकटविण्याचा इशारा साधू- महंतांनी दिला आहे. 

घटनेची गंभीरपणे चौकशी व्हावी, असा होतोय मंडळीचा आग्रह

पालघर जिल्ह्यातील गडचिंचले भागात गुरुवारी (ता.16) रात्री या मार्गावरून सुरतला जाणाऱ्या दक्षिणमुखी हनुमान आखाड्याचे महंत कल्पवृक्षगिरी ऊर्फ चिकने महाराज यांच्यासह तिघांची जमावाने निर्दयपणे हत्या केली. पोलिसांच्या वाहनात संरक्षण दिल्यानंतरही त्यांचा जीव वाचू शकला नाही. पोलिस वाहनाच्या काचा जमाव बेधुंद होऊन मारहाणीच्या व्हायरल व्हिडिओने त्र्यंबकेश्‍वरसह सर्वच साधू- महंतांत प्रचंड रोष आहे. पालघर पोलिसांची तटस्थता चर्चेचा विषय ठरली तशी एवढ्या निर्घूण हत्येमागे कटाचा संशय घेणारे थेट प्रश्‍नही आखाडा परिषदेसह काही महंतांनी उपस्थित केले आहेत. सोशल माध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडिओतील दृश्‍य बघता अतिशय निर्घूण हल्ल्यात सत्तर वर्षांच्या महंतांच्या मृत्यूने त्र्यंबकेश्‍वर भागातील विविध आखाड्यांतील साधू-महंतांसह धार्मिक संस्थांत शोककळा पसरली आहे. त्यामुळे या घटनेची गंभीरपणे चौकशी व्हावी, असा या मंडळीचा आग्रह आहे. 

वादामुळे संशयकल्लोळ
 

त्र्यंबकेश्‍वर हे देशातील पर्यटकांचा अविरत राबता असलेले देशातील प्रमुख धार्मिक तीर्थस्थळ असल्याने येथील देवस्थानच्या जमिनी मिळविण्यासाठी कायमच स्पर्धा आणि गुन्हेगारी घटनाचा लांबलचक इतिहास आहे. कोट्यवधीच्या जमिनी घशात घालण्याच्या गुन्हेगारी कटाच्या या नगरीत मृत कल्पवृक्षगिरी ऊर्फ चिकने महाराज ज्या दक्षिणमुखी हनुमान मंदिराचे पुजारी व देखभाल करायचे त्या जागेच्या वादावरून त्यांना कुंभमेळ्यात दमबाजीच्या प्रकाराची चर्चा आहे. जमिनीच्या कब्जावरून वाद गुन्हेगारी स्वरूपाची कृत्य या भागात नवीन नाहीत. धार्मिक स्थळांच्या मोक्‍याच्या जमिनीसाठी साधू- महंत फोडण्यापासून तर अनेक गुन्हेगारी स्वरूपाचे प्रकार या भागाला नवीन नाही. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Closing: शेअर बाजार लाल रंगात; सेन्सेक्स-निफ्टी मोठ्या घसरणीसह बंद, कोणते शेअर्स वाढले?

Sanjay Shirsat: अंबादास दानवेंनी लावलेली आग अन् फडणवीसांनी केलेला गेम, संजय शिरसाट कसे फसले?

Beed Baby News: मृत घोषित केलेलं बाळ रात्रभर दुर्लक्षित; दुसऱ्या दिवशी बॅगमध्ये टाकून नेलं, कुदळ सापडेना म्हणून झाला उशीर अन्...

तेजश्री प्रधानच्या झी मराठीवर दिसण्यावर स्टार प्रवाहच्या सतीश राजवाडेंची थेट प्रतिक्रिया; म्हणाले, 'ती नायिका आधी...

IND vs ENG 3rd Test: जो रूटचे विक्रमी शतक! भारतासमोर मजबूत भिंतीसारखा राहिलाय उभा; राहुल द्रविड, स्टीव्ह स्मिथचा विक्रम मोडला

SCROLL FOR NEXT