cctv footage esakal
नाशिक

Nashik Crime: सिडकोतील शिवाजी चौकात युवकाचा चाकू भोसकून खून; अंबड हद्दीत महिन्याभरात खूनाची चौथी घटना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : सिडकोतील शिवाजी चौकात २३ वर्षीय युवकाचा दोन दुचाक्यांवरून आलेल्या सहा संशयितांनी धारदार हत्याराने वार केले तसेच, पोटात चाकू भोसकून खून केल्याची घडली. काही दिवसांपूर्वी झालेल्या वादातून सदरची घटना घडल्याचे समजते.

दरम्यान, गेल्या महिनाभरात अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खूनाची ही चौथी घटना असून, पोलीस निष्क्रियतेमुळे सिडकोत गुन्हेगारी बोकाळली आहे. (Youth stabbed to death in Shivaji Chowk in CIDCO Fourth incident of murder in Ambad area within month Nashik Crime)

संदीप प्रकाश आठवले (२३, रा. सिडको) असे मयत युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संदीप आठवले हा शिवाजी चौकात असताना दोन दुचाक्यांवरून सहा संशयित आले.

त्यांनी काही दिवसांपूर्वी इंदिरानगर परिसरात झालेल्या भांडणाची कुरापत काढून वाद घातला. त्यातून संशयितांनी त्यांच्याकडील धारदार हत्यारांनी संदीपवर वार केले. तर एकाने चाकूच संदीपच्या पोटात भोसकला.

संदीप कोसळताच संशयितांनी पोबारा केला. जखमी संदीपला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, वैद्यकीय अधिकार्यांनी तपासून मयत घोषित केले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

घटनेची माहिती मिळताच पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणात तीन संशयित हे रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे समजते. संशयितांची ओळख पटली असून पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

दरम्यान, अंबड पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच गुन्हेगारी बोकाळली असून, पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक न राहिल्याने गुन्हेगारांचीच दहशत नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal: मला एक दिवस कॅप्टन व्हायचंय! जैस्वालची 'मन की बात'; शुभमन गिलसमोर उभा राहिला स्पर्धक

Prashant Kishor Statement : बिहार निवडणुकीच्या तारखांच्या घोषणेनंतर, आता प्रशांत किशोर यांनी केलं मोठं विधान, म्हणाले...

PM Modi Calls Chief Justice Gavai: सरन्याधीश गवईंना पंतप्रधान मोदींचा फोन; सर्वोच्च न्यायालयातील 'त्या' घटनेची घेतली गंभीर दखल!

तयारीला लागा! सोलापूर जिल्ह्यातील १७ पैकी ‘या’ १३ नगरपरिषदांमध्ये महिला होणार नगराध्यक्षा; नगरसेवकांच्या आरक्षणाची बुधवारी सोडत

Pune News : आमदार बापू पठारे यांना धक्काबुक्कीप्रकरणी २० जणांवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT