Nashik ZP News
Nashik ZP News  esakal
नाशिक

ZP Employees Transfer : जिल्हा परिषद कर्मचारी बदल्यांचा मार्ग खुला; राज्य शासनाकडून पत्र प्राप्त

सकाळ वृत्तसेवा

ZP Employees Transfer : जिल्हा परिषदेतील रिक्त जागांमुळे आदिवासी व बिगर आदिवासी भागातील समतोल असल्याने कर्मचारी बदल्यांबाबत संभ्रम निर्माण झाला होता. मात्र, हा संभ्रम दूर झाला असून, बदल्यांचा मार्ग खुला झाला आहे.

राज्य शासनाने जिल्हा परिषदेला पत्र देत, शासन आदेशाप्रमाणे बदल्यांची कार्यवाही करण्याचे आदेश निर्गमित केले आहे. (Zilla Parishad employee transfers open Letter received from State Govt nashik news)

कोरोना संकटामुळे दोन वर्ष कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रीया होऊ शकली नव्हती. गतवर्षी आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील असमतोल ढासळला जाईल, असे कारण पुढे करत कर्मचारी वर्गाच्या बदल्या होऊ शकल्या नाहीत.

यंदा बदल्यांची प्रतिक्षा कर्मचारी वर्गास लागलेली असतानाच नाशिक विभागातील इतर जिल्हा परिषदांनी बदल्यांची तयारी करत वेळापत्रक जाहीर केले. त्यानंतर लागलीच नाशिक जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासनाने कर्मचारी बदल्यांचे वेळापत्रक जाहीर केले.

येत्या १६ ते १९ मे दरम्यान ही बदली प्रक्रीया पार पडणार आहे. वेळापत्रक जाहीर झालेले असले तरी, रिक्त जागांचे प्रमाण जास्त असल्याने आदिवासी व बिगर आदिवासी क्षेत्रातील जागांचा समतोल साधला जात नसल्याने बदल्यांवर सावट होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

याबाबत प्रशासनाने राज्य शासनाकडे मार्गदर्शन देखील मागविले होते. परंतु, राज्य शासनाकडून मार्गदर्शन मिळाले नाही. यंदा बदल्यांसाठी कर्मचारी वर्ग आग्रही झाले असून आदिवासी तालुक्यातील कर्मचाऱ्यांनी विभागीय आयुक्तांकडे बदल्यांची मागणी केली होती.

असे असतानाच बुधवारी (ता.१०) ग्रामविकास विभागाने राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांना पत्र काढत बदल्यांबाबत असलेल्या धोरणांची अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले.

जिल्हा परिषदेतील गट क व गट ड च्या कर्मचाऱ्यांच्या तसेच जिल्हा परिषदेतील ग्रामसेवक, ग्रामविस्तार अधिकारी यांच्या प्रशासकीय विनंती बदल्यांबाबतची कार्यवाही शासन निर्णयामध्ये नमूद केल्यानुसार विहित कालावधीत आणि नमूद केलेल्या टक्केवारीनुसार करावी, असे ग्रामविकास विभागाने दिलेल्या पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे कर्मचारी बदल्या होणार असे निश्चित मानले जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Bomb Threat: "दादरच्या मॅकडोनाल्डमध्ये बॉम्बस्फोट होणार," पोलीस नियंत्रण कक्षाला आलेल्या फोनमुळे खळबळ

Swati Maliwal: '...तर सिसोदिया आज इथं असते...', आपच्या मोर्चाच्या निर्णयानंतर स्वाती मालीवाल यांचं ट्विट

Simple Hacks: कुलर सुरू असताना पण खोली दमट वाटते? थंडावा निर्माण करण्यासाठी वापरा 'या' ट्रिक्स

Mumbai local: मुंबईत लोकलच्या गर्दीमुळे झालेला मृत्यू अपघातच! जबाबदारी रेल्वे प्रशासनाची, भरपाई देण्याचे कोर्टाचे आदेश, नाहीतर...

Singham Again: श्रीनगरमध्ये सुरुये 'सिंघम अगेन'चं शूटिंग; अजय देवगण आणि जॅकी श्रॉफ यांच्या अॅक्शन सीनचा व्हिडीओ व्हायरल

SCROLL FOR NEXT