Deputy Chief Executive Officer Ravindra Pardeshi while inspecting the cleanliness of the Zilla Parishad headquarters on Thursday. Neighboring workforce.  esakal
नाशिक

Nashik ZP News : नव्या वर्षांच्या पहिल्याच दिवशी जिल्हा परिषदेची परीक्षा; 1 जानेवारीला आढावा

जिल्हा परिषदेत ३१ डिसेंबरचा फीव्हर दिसत असला तरी, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२४ ला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.

सकाळ वृत्तसेवा

Nashik ZP News : जिल्हा परिषदेत ३१ डिसेंबरचा फीव्हर दिसत असला तरी, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच १ जानेवारी २०२४ ला विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेणार आहेत.

आढावा बैठकीचे विषय निश्चित असले तरी, १५ व्या वित्त आयोगाच्या निधी खर्चा जिल्हा काहीसा पिछाडीवर असल्याने तसेच अनेक विभागांच्या कामकाजाबाबत असलेल्या तक्रारींच्या अनुषगांनेही बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. (Zilla Parishad Exam on very first day of new year nashik news)

त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत. विभागीय आयुक्त गमे विभागांतर्गत जिल्हा परिषदेमध्ये विकासकामांसंदर्भात आढावा बैठक याच आठवड्यात निश्चित झाली होती. परंतु मुख्य कार्यकारी अधिकारी रजेवर असल्याने ही बैठक ऐनवेळी रद्द झाली होती. रद्द झालेली ही बैठक सोमवारी (ता.१) दुपारी तीनला होणार आहे. बैठकीसाठी जिल्हा परिषदेमधील सर्व विभागप्रमुख व गटविकास अधिकारी उपस्थित राहतील.

बैठकीत प्रामुख्याने विकसित भारत संकल्प यात्रा, गोदी आवास योजना, राज्य पुरस्कृत आवास योजना (शबरी/रमाई), स्वच्छ भारत अभियान, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मंजूर घरकुलांना जागा उपलब्ध करण्याबाबत, प्रधानमंत्री आवास योजना, जलजीवन मिशन, माझी वसुंधरा अभियान ४.०, राष्ट्रीय ग्रामस्वराज्य अभियान (RGSA) (ग्रामपंचायत इमारत बांधकाम), वित्त आयोग १४ वा वित्त आयोग शिल्लक निधी व १५ वा वित्त आयोग खर्चाचा आढावा होणार आहे. बैठकीच्या अनुषगांने उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांनी सर्व विभागांना पत्र देत आवश्यक माहिती, कागदपत्रे अपडेट करण्याचे निर्देश दिले.

परदेशी यांच्याकडून पाहणी

पुढील आठवड्यात विभागीय आयुक्त जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी येणार असल्याने उपमुख्य कार्यकारी अधिकारी परदेशी यांनी गुरुवारी (ता. २८) सभागृह, मुख्यालय व आवाराची पाहणी केली. या वेळी त्यांन स्वच्छता करण्याचे निर्देश दिले. तसेच सभागृहातील किरकोळ डागडुजी करण्याचेही निर्देश दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Maharashtra News Updates : राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यासपीठावर दाखल

मोठी बातमी! राज ठाकरेंना आव्हान देणाऱ्या सुशिल केडियांचं ऑफीस मनसैनिकांनी फोडलं, पाहा VIDEO

Video : "वारी चुकली, पण विठ्ठल भेटला" हॉस्पिटलमध्ये घडली हृदयस्पर्शी घटना; व्हायरल व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील..

Mumbai : आमचं नातं शरीर संबंधाच्या पलिकडचं, आजही...; विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण करणाऱ्या शिक्षिकेचा खळबळजनक दावा

ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव सहभागी; "झेंडा नाही अजेंडा बघून लोक एकत्र"

SCROLL FOR NEXT