ZP Nashik esakal
नाशिक

नाशिक : ग्रामपंचायत विभागाचा अवघा 11 टक्के निधी खर्च

विक्रांत मते

नाशिक : शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागाचा विकास झाला पाहिजे असे शासनाचे धोरण असताना ग्रामीण भागाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला जातो, मात्र नाशिक जिल्हा परिषदेला (ZP) १५ व्या वित्त आयोगातून प्राप्त झालेल्या एकूण निधीपैकी ग्रामपंचायत (Gram Panchayat) विभागाकडील ३७ कोटी पैकी अवघा अकरा कोटी रुपये निधी खर्च केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषद प्रशासनाची ही कासव गती मात्र ग्रामीण विकासात मोठा अडथळा ठरताना दिसत आहे. (Zilla Parishad unspent funds Nashik News)

ग्रामिण भागाच्या विकासासाठी केंद्र सरकार वित्त आयोगातून निधी देते. नाशिक जिल्हा परिषदेला पंधराव्या वित्त आयोगाचा निधी प्राप्त झाला. त्यातील प्रत्येकी दहा टक्के रक्कम जिल्हा परिषद व पंचायत समित्यांना अदा करण्यात आली. सन २०२०-२१ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला ३२.८० कोटी रुपये निधी प्राप्त झाला होता. निधी प्राप्त झाल्यानंतर विकासकामांचे नियोजन तत्काळ करून निधी खर्च होणे अपेक्षित होते. परंतु, निधी खर्चाबाबतचा शासनाचा निर्णय यात संदिग्ध जिल्हा परिषद प्रशासनाने नियोजन करण्यास विलंब केला. प्राप्त झालेल्या निधीचे मागील वर्षाचे नियोजन करून निविदा प्रक्रिया राबविण्यात आली.

नियोजन बारगळले

जिल्हा परिषद नियोजन केलेल्या कामांपैकी ११ टक्के कामे पूर्ण झाली आहेत. मागील आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाल्यानंतर नियोजनातील कामांना जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत २८ फेब्रुवारीला मंजुरी देण्यात आली. परंतु नियोजनातील त्यामुळे प्राप्त निधीतील कामांचे वाटप करताना विलंब झाला. आता जून महिना उलटत असताना अद्यापही १०० टक्के वर्क ऑर्डर देण्यात आलेल्या नाहीत. सन २०२२-२३ या आर्थिक वर्षात जिल्हा परिषदेला २५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला. मात्र अद्याप त्याचेही नियोजन झालेले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nilesh Ghaywal Acquitted : निलेश घायवळसह सहा आरोपींची निर्दोष मुक्तता; मोका न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

Bank Holiday October 2026: ऑक्टोबरमध्ये बँका 16 दिवस बंद! महाराष्ट्रात किती दिवस सुट्टी? पाहा RBIची संपूर्ण यादी

Chiplun Municipality : चिपळूण नगरपालिकेत नोकरीसाठी 15 लाखांची मागणी? सत्ताधारी नगरसेवकाच्या गंभीर आरोपामुळे खळबळ, प्रशासनाचे स्पष्टीकरण

‘या’ राशींचे लोक असतात खूप जास्त इमोशनल, भावनेच्या भरात घेतात निर्णय, नंतर होतो पश्चात्ताप; त्यांच्या या स्वभावाचा फायदा घेतात लोक

Marathi News Live Updates: मुंबई-अहमदाबाद मार्गावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT