ZP CEO Ashima Mittal, Nashik News esakal
नाशिक

Swachh Bharat Abhiyan: जिल्हाभरात सोमवारी एक तास श्रमदानाचा उपक्रम : ZP CEO मित्तल

अभियानात सहभागी होऊन गाव स्वच्छतेत योगदान देण्याचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Swachh Bharat Abhiyan : स्वच्छ भारत अभियानांतर्गत देशभरात १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशात १ ऑक्टोबरला ‘एक तारीख- एक तास’ हा श्रमदानाचा उपक्रम राबविण्यात येणार असून, या दिवशी सर्व गावांमध्ये सकाळी दहाला एकाच वेळी श्रमदान मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व नागरिक तसेच सामाजिक संस्था, युवक मंडळे यांनी या अभियानात सहभागी होऊन आपल्या गावाच्या स्वच्छतेसाठी योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे. (ZP CEO Mittal order Swachh Bharat Abhiyan One hour labor donation initiative across district on Monday nashik)

देशभरात एकाच वेळी आयोजित करण्यात आलेला हा मोठा उपक्रम असून, शहर, नगर परिषद, तसेच प्रत्येक गावात सदरचा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

उपक्रमात सहभागी होण्याबाबत जिल्ह्यातील मंत्री, खासदार व आमदार यांनाही आमंत्रित करण्यात येत असून, दिंडोरी येथील रामशेज येथे आयोजित कार्यक्रमात केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार स्वतः सहभागी होतील.

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ यांच्यासह इतर लोकप्रतिनिधीही या उपक्रमात सहभागी होणार आहेत.

रविवारी (ता. १) कार्यक्रमासाठी केंद्र सरकारच्या संकेतस्थळावर जिल्ह्यातील सर्व महसुली गावांचे इव्हेंट तयार करून नोंदविण्यात आले आहेत. कार्यक्रम झाल्यावर कार्यक्रमस्थळाचा फोटो अपलोड करून माहिती भरून इव्हेंट पूर्ण करावयाचा आहे.

देशाचे पंतप्रधान स्वत: श्रमदान मोहिमेत सहभागी होणार असल्याने सर्वांना उपक्रम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

सदरचा श्रमदान कार्यक्रम गावातील प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, अंगणवाडी व शाळा परिसर, सार्वजनिक व खासगी कार्यालयांचा परिसर, पर्यटनस्थळ, बसस्थानक, धार्मिक स्थळ, नदी किनारे आदी ठिकाणी आयोजित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

यासाठी महिला बचतगट, सर्व ग्रामपंचायत सदस्य, गावातील सर्व शासकीय कर्मचारी, युवक मंडळे, विविध विकास सोसायटीचे पदाधिकारी, विविध सामाजिक संस्था, धर्मदाय प्रतिष्ठान, इतर मंडळे व संस्था आदींचा सहभाग घेण्याचे आवाहनही मित्तल यांनी केले आहे.

या मोहिमेसाठी प्रत्येक गावाकरिता संपर्क अधिकारी नेमण्यात आला असून, जिल्हा परिषद गटस्तरावर नोडल अधिकारी व तालुका स्तरावर तालुका संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्हास्तरीय खातेप्रमुखांनाही तालुक्यांचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपक पाटील यांनी दिली.

सदरचा उपक्रम सर्व गावांमध्ये यशस्वीपणे राबविण्याचे व सर्व ठिकाणांची शाश्वत स्वच्छता करण्याचे आवाहन मित्तल यांनी केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: फुल राडा! यशस्वी जैस्वालने DRS घेताच बेन स्टोक्स खवळला; अम्पायरला दाखवलं बोट, प्रेक्षकांचे Booing

IND vs ENG 2nd Test: यशस्वी जैस्वालची विक्रमी कामगिरी! मोहम्मद सिराज लै भारी; टीम इंडियाकडे २४४ धावांची आघाडी

Ranya Rao : रान्या राव ‘Gold smuggling’ प्रकरणी ‘ED’ची मोठी कारवाई!

IND vs ENG 2nd Test: मोहम्मद सिराजच्या सहा विकेट्स, आकाश दीपने फिरवली मॅच; इंग्लंड ALL OUT, भारताकडे मजबूत आघाडी

मोठी बातमी! फार्मसी, बीबीए, बीसीएससह ‘या’ अभ्यासक्रमांसाठी प्रवेश अर्ज भरण्यास प्रारंभ; अर्जाचे शुल्क 800 ते 1000 रुपये; जाणून घ्या, वेळापत्रक...

SCROLL FOR NEXT