ZP Officers felicitation esakal
नाशिक

Nashik : ZP कर्मचाऱ्यांनी फोडले तोतयाचे बिंग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेत नोकरी देण्याचे आमिष दाखवीत उमेदवारांकडून पाच हजार रुपये घेऊन फसवणूक करणाऱ्या संशयितास बुधवारी (ता. २१) जिल्हा परिषद कर्मचारी तथा माजी सैनिकांनी पकडून देत पोलिसांच्या स्वाधीन केले. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामगिरीमुळे उमेदवारास त्याचे पैसे मिळत त्याची फसवणूक टाळल्याबद्दल आणि कर्मचाऱ्यांनी केलेल्या या कामाची पावती म्हणून त्यांचा जिल्हा परिषद अधिकारी वर्गातर्फे सत्कार करण्यात आला. (ZP employee arrested suspect cheated candidates by luring job Nashik Crime News)

बुधवारी (ता. २१) सकाळी एकाला संशयिताने जाळ्यात ओढून त्यास जिल्हा परिषदेत सुरक्षारक्षक म्हणून नोकरीस देण्याचे आमिष दाखवून त्यास जिल्हा परिषदेत बोलावले. त्यानंतर त्याच्याकडून पाच हजार रुपये घेत त्यास गुरुवार (ता.२२) पासून कामावर येण्यास सांगितले. यानंतर या इसमाने जिल्हा परिषद प्रवेशद्वारावर तैनात कर्मचारी तथा माजी सैनिक संजय खैरनार आणि श्री. वाघ यांच्याशी संपर्क साधत त्यांच्याकडून कामाबद्दल विचारणा केली.

त्यानंतर श्री. खैरनार व वाघ यांनी त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्या इसमाने सुरक्षारक्षक म्हणून नियुक्ती झाली असल्याचे सांगितले. त्यानंतर दोघा माजी सैनिकांनी पैसे ज्यांना दिल्यास त्यास प्रवेशद्वारावर बोलावून घेऊन ताब्यात घेतले. त्यानंतर संबंधितांचे पैसे त्यास परत देण्यात आले. संशयिताने यापूर्वीदेखील अनेकांना फसविले असल्याचे लक्षात आल्यानंतर माजी सैनिकांनी तत्काळ भद्रकाली पोलिस ठाण्यात संपर्क केला.

यानंतर पोलिसांनी या भामट्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत हा भामटा नाणेगाव (ता. नाशिक) येथील असून त्याच्याविरुद्ध काही गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली. जिल्हा परिषद कर्मचारी संजय खैरनार आणि श्री. वाघ यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांचा जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेसह माजी सैनिक संघटना अध्यक्ष गोविंद बस्ते, श्री. राठोड यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT