Zilla Parishad Construction Division One Executive Engineer Sandeep Sonawane has taken charge. esakal
नाशिक

Nashik News : ZP कार्यकारी अभियंता सोनवणे रुजू

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषद बांधकाम विभाग एकचे कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांनी पदभार स्वीकारला आहे. प्रभारी कार्यकारी अभियंता संजय नारखेडे यांच्याकडून त्यांनी पदभार घेतला. कार्यकारी अभियंता रुजू झालेले असले तरी सोमवारी (ता. ६) ते प्रत्यक्षात कामकाजाला सुरवात करणार आहेत. (ZP Executive Engineer Sonwane joins Nashik News)

बांधकाम विभाग एकचे वादग्रस्त कार्यकारी अभियंता सुरेंद्र कंकरेज यांची गत आठवड्यात बदली झाली. त्यांच्या जागेवर नगर जिल्हा परिषद कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांची बदली झाली आहे.

यामुळे काही महिन्यांपासून रिक्त असलेल्या बांधकाम विभाग क्रमांक एकला आता पूर्णवेळ कार्यकारी अभियंता मिळाले. कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी बांधकाम एक विभागात येऊन पदभार स्वीकारला. बांधकामचे दोनचे कार्यकारी अभियंता नारखेडे यांनी त्यांचे स्वागत केले.

शाखा अभियंता आर. आर. बाविस्कर, शाखा अभियंता ए. आर. शिंदे, उपअभियंता नितीन चौधरी, महाराष्ट्र इंजिनिअरिंग असोसिएशनचे मुख्य संघटक अनिल आव्हाड, सतीश पाटील, किरण देशमुख, अनिल चौगुले, नवनाथ घुगे, तानाजी घुले आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

कार्यकारी अभियंता सोनवणे यांनी पदभार घेतल्यानंतर जिल्ह्यात काम केलेले असून, जिल्हा परिषदेतही काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे सर्वांना विश्वासात घेऊन कामकाज करणार असल्याची ग्वाही या वेळी दिली.

अनिल आव्हाड यांनी ठेकेदार, सुशिक्षित बेरोजगार यांच्या विविध समस्या मांडत, त्या सोडविण्याची मागणी केली, तर ठेकेदारांकडून सहकार्य करण्याचे आश्वासन किरण देशमुख यांनी दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Road Accidents Reduction : २०३० पर्यंत रस्ते अपघात ५० टक्क्यांनी कमी होणार? ; राज्यसभेत गडकरींनी दिली महत्त्वपूर्ण माहिती

Pune Mumbai Expressway Traffic : द्रुतगती मार्गावरील अपघाताचा फटका; पुणे-बंगळूर महामार्गावर अवजड वाहतूक ठप्प

T20 World Cup: इशान किशनच ओपनर! सूर्याचा विश्वास पठ्ठ्याने सार्थ ठरवला, 7 Six अन् फिफ्टी; संजूचे स्थान धोक्यात

Pune Crime : मैत्रिणीला फोन केल्याच्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला

Jan Arogya Yojana : राज्‍यातील उपकेंद्र, प्राथमिक आरोग्‍य केंद्रातही महात्‍मा फुले योजना; आता बाह्यरुग्ण विभागातील उपचारही मिळतील मोफत

SCROLL FOR NEXT