Nashik ZP CEO Ashima Mittal esakal
नाशिक

Nashik : ZPच्या नव्या CEOना निवासस्थानाची प्रतीक्षा!

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांना रूजू होऊन दीड महिला उलटला असला तरी, त्यांना अद्याप शासकीय निवासस्थान मिळालेले नाही. तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी अद्याप शासकीय निवासस्थान न सोडल्यामुळे मित्तल यांना शासकीय विश्रामगृहावर राहण्याची नामुष्की आली आहे. येथे, त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याची चर्चा जिल्हा परिषदेच्या वर्तुळात आहे. (ZP new CEO Ashima mittal waiting for residence Nashik Latest Marathi News)

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शासकीय निवासस्थान मिळते. श्रीमती बनसोड यांची २८ सप्टेंबर २०२२ ला बदली झाली. त्यांच्या जागी आशिमा मित्तल यांची नियुक्ती झाली. मित्तल यांनी २९ सप्टेंबरला सूत्रे स्वीकारत कामकाजाला सुरवात केली. तेव्हापासून मित्तल यांचा मुक्काम शासकीय विश्रामगृहावर आहे. बनसोड यांची पालघर येथील बदली रद्द झाली असून, आदिवासी विकास विभागात बदली झाल्याने त्या नाशिकमध्येच आहेत. बदली होऊन एक महिना उलटला तरी त्यांनी अद्याप शासकीय निवासस्थान सोडलेले नाही.

त्यांना दुसरीकडे शासकीय निवासस्थान मिळाले आहे. परंतु, त्याचे नूतनीकरण सुरू आहे. नूतनीकरण झाल्यावर त्या बंगल्यात स्थलांतर होणार असल्याचे समजते. दुसरीकडे, मित्तल यांना शासकीय विश्रामगृहावर जेवणासह इतर सर्वच गोष्टींची अडचण होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे चर्चा झाल्याचे बोलले जात आहे. शासकीय अधिकाऱ्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी तत्काळ शासकीय बंगला सोडावा, असा नियम आहे. परंतु, काही अडचण असल्यास त्यांना तीन महिने बंगला स्वत:कडे ठेवता येतो. पण त्याचे स्वेअर फुटाप्रमाणे भाडे आकारले जाते. दरम्यान, जिल्हा परिषद आता काय भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India Arunachal Pradesh and China : ‘’अरुणाचल प्रदेश हा भारताचा अभिन्न अन् अविभाज्य भाग’’ ; भारताने चीनला कडक शब्दांत सुनावलं!

Suryakumar Yadav Prediction : ‘T20 World Cup 2026’चं शेड्यूल जाहीर होताच, कॅप्टन सूर्याने थेट फायनल मॅचबाबत केलं भाकीत!

Supriya Sule: बिनविरोध निवडणुकांवर सुप्रिया सुळेंचा 'आक्षेप'; राज्य निवडणूक आयोगाला लिहिलं पत्र

Pune University :पुणे विद्यापीठात बिबट्या वावराच्या चर्चा; सूर्यास्तानंतर बाहेर पडू नका; विद्यापीठाचे आवाहन!

Mumbai Crime: पाच वर्षांच्या चिमुकलीचा ५० हजारांत सौदा! मुंबईतल्या वाकोला पोलिसांनी केला रॅकेटचा पर्दाफाश

SCROLL FOR NEXT