Panchayat Samiti & ZP Election Nashik Latest Marathi News esakal
नाशिक

जि. प., पंचायत समिती पंचवार्षिक निवडणूक आरक्षण सोडत तूर्त स्थगित

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषद (ZP) व पंचायत समिती (Panchayat Samiti) पंचवार्षिक निवडणुकांसाठी (five year election) उद्या (ता. १३) आरक्षण सोडत कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मात्र सदर सोडत कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या (State Election Commission) आदेशान्वये तूर्त स्थगित करण्यात आला आहे. याबाबत शासनाच्या आदेशानंतर पुढील निवडणूक कार्यक्रम होणार असल्याची माहिती उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) नितीन गावंडे यांनी दिली. (ZP Panchayat Samiti stop five year election reservation immediately postponed Nashik Latest Marathi News)

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणप्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील मंगळवारी (१२) सुनावणी पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे १९ जुलैला पुन्हा सुनावणी होणार आहे. सुनावणीदरम्यान राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात तूर्तास कोणतीही नवी अधिसूचना न काढण्याचे आदेश कोर्टाने राज्य सरकारला दिले.

त्यामुळे कोर्टाचा आदेश येईपर्यंत राज्यात कोणत्याही नवीन निवडणुका जाहीर होणार नाही. राज्य सरकारने स्थानिक निवडणुकांसंदर्भात काही अधिसूचना जारी केल्या असतील, तर त्यात हस्तक्षेप करणार नाही, असेही न्यायालयाने निर्देश दिले आहेत.

यासंदर्भात जारी करण्यात आलेल्या शासकीय प्रसिद्धी पत्रकात गावंडे यांनी नमूद केले आहे की, जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीसाठी अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला) व सर्वसाधारण (महिला) यांच्या करिता आरक्षण सोडत कार्यक्रम उद्या (बुधवार) घोषित करण्यात आला होता.

परंतु राज्य निवडणूक आयोगाने १२ जुलैच्या निर्देशान्वये त्यास तूर्तास स्थगिती दिली आहे. या संदर्भातील सुधारित आरक्षण सोडत कार्यक्रम यथावकाश घोषित करण्यात येईल, असेही राज्य निवडणूक आयोगाने कळविले असल्याचे उपजिल्हाधिकारी श्री. गावंडे यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नातेवाईक नाहीत, आधार नाही; शेवटच्या प्रवासाची चिंता मिटवण्यासाठी वृद्धाने केलं स्वतःचं श्राद्ध

“मी स्क्रिप्ट वाचत नाही, तर लेखक किंवा दिग्दर्शकाकडून त्यांचं व्हिजन ऐकतो” सिनेमा निवडण्यावर सलमानचा खुलासा

Best Mileage Bikes : कमी पेट्रोलमध्ये जास्त चालतात 'या' 5 दमदार बाईक्स; सर्वाधिक मायलेज अन् किंमत लाखाच्या आतच

वल्लरीचा खोटेपणा उघड होणार? तू हि रे माझा मितवा मधील ट्विस्टने प्रेक्षक चकित

Latest Marathi News Live Update : पुण्यात पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा शोध तीव्र

SCROLL FOR NEXT