नाशिक : जिल्हा परिषद व ओपन लिंक्स फाउंडेशन यांच्या माध्यमातून पुढील काळात जिल्हा परिषदेतील शिक्षकांसाठी ‘विनोबा’ अॅपचा वापर करण्यात येणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, ओपन लिंक्स फाउंडेशनचे संजय दालमिया, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी यांच्या उपस्थितीत सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली. (ZP School Use of Vinoba app contract between ZP and Open Links Foundation Nashik Latest Marathi News)
जिल्हा परिषद शाळांतील शिक्षकांसाठी ओपन लिंक्स फाउंडेशनकडून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांशी निगडित सर्व प्रकारच्या माहितीचे संकलन हे विनोबा नावाच्या अॅपमध्ये करण्यात येणार आहे. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी गुरुवारी (ता. ८) पत्रकार परिषदेत अॅपबाबत माहिती दिली. आचार्य विनोबा भावे शिक्षक सहाय्यक अॅप शिक्षणाच्या अनुभव बाबतीत शाळेतील ९० टक्के विद्यार्थ्यांवर त्यांच्या शिक्षकांचा प्रभाव असतो. ‘विनोबा’ हा एक माहिती तंत्रज्ञानावर आधारित अॅप आहे. भारतामध्ये उच्च गुणवत्तेवर आधारित के -१० शिक्षणपद्धती आणण्याचा आमचा प्रयत्न आहे.
शिक्षकांचा दैनंदिन कामातील वेळ वाचवून शिक्षकांना काही अर्थपूर्ण काम करण्यास वेळ मिळावा व यासाठी आमचा प्रयत्न असल्याचे मित्तल यांनी सांगितले. ‘विनोबा’ हे शिक्षकांसाठी एक असे व्यासपीठ आहे ज्यावर शिक्षक त्यांनी केलेले काम इतरांबरोबर शेअर करतात, इतरांच्या पोस्ट्समधून शिकतात, तसेच चांगल्या कामासाठी त्यांचा गौरवदेखील केला जातो. शिक्षकांना सोपे व्हावे व त्यांचा वेळ वाचावा म्हणून त्यांना अधिक चांगल्या पद्धतीने शिकवता यावे यासाठी पाठांचे नियोजन, उपक्रम, कार्यपत्रके, नेमून दिलेली/पूर्ण केलेली कामे इथे सहज उपलब्ध होणार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.
हेही वाचा : Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
हे आहेत ‘विनोबा’ अॅपचे फायदे
- दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी उपयुक्त
- दिव्यांग विद्यार्थ्यांच्या मदतीत सुधारणा करणे सोपे होणार
- शिक्षकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी फायदेशीर
- विविध घटकांशी संपर्क साधता येणार
- प्राथमिक शिक्षकांना अध्यापन पद्धतीत सुधारणा करण्यासाठी फायदेशीर
‘विनोबा’ अॅपवर करता येणारे उपक्रम
शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची ऑनलाइन मॉक चाचणी घेणे, केंद्रस्तरीय शिक्षण परिषद पूर्व व उत्तर चाचणी, साधन व्यक्ती व विशेष शिक्षकांचे शाळाभेट प्रपत्र सादर करणे, शालेय व्यवस्थापन समिती बैठकीचा अहवाल सादर करणे, विषय साधन व्यक्तींचे मासिक अहवाल सादर करणे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.