Chief Executive Officer Ashima Mittal playing tennis at the ongoing Zilla Parishad Staff Sports Tournament at Shivaji Stadium esakal
नाशिक

ZP Sports Competition : बीडीओच विभागप्रमुखांना पडले भारी!

मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांचाही स्पर्धांमध्ये सहभाग

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषद क्रीडा स्पर्धांचा शुक्रवारी (ता.३) दुसऱ्या दिवशी जिल्ह्यातील विविध संवर्गांच्या कर्मचाऱ्यांनी सहभाग घेत आपले कौशल्य दाखविले. कर्मचारी खेळाडूंचा उत्साह वाढविण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनीही बुद्धिबळ आणि टेबल टेनिस या स्पर्धांमध्ये सहभाग घेतला.

बुध्दीबळ स्पर्धेंत मित्तल पहिल्या डावात विजयी झाल्या. रस्सीखेचच्या झालेल्या स्पर्धेंत सर्व तालुका गटविकास अधिकारी, मुख्यालयातील विभागप्रमुखांना मात्र नेहमीप्रमाणे भारी पडले. (ZP Sports Competition ceo ashima mittal take part nashik news)

जिल्हा परिषद कर्मचार्-यांच्या क्रीडा स्पर्धांना गुरूवारपासून सुरूवात शिवाजी स्टेडियमवर सुरूवात झाली. स्पर्धेंच्या दुस-या दिवशी बुद्धिबळ, गोळा फेक, खो खो, कबड्डी, थाळी फेक, भाला फेक, पोहणे, टेबल टेनिस, बॅटमिंटन, १००,२००,४०० मीटर धावणे या स्पर्धा झाल्या.

यात तालुकासंघ, मुख्यालयसंघ यांनी सहभाग नोंदविला. या कार्यक्रमासाठी पोलीस आयुक्त अंकुश शिंदे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. मुख्यकार्यकारी अधिकारी मित्तल यांनी कर्मचा-यांसोबत बुध्दीबळ, टेनिस या स्पर्धेंत सहभाग घेत, कर्मचाऱ्यांसोबत अधिका-यांचा उत्साह वाढवला.

सायंकाळी जिल्हा परिषद मुख्यालयातील कर्मचाऱ्यांच्या सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये वैयक्तिक गायन, समूह गीत गायन, वैयक्तिक नृत्य, सामूहिक नृत्य या स्पर्धांमध्ये पुरुष आणि महिला कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

हेही वाचा : 'पठाण'..आणि २०२३ मधले बाॅलीवूड..कसे असतील दिवस

या कार्यक्रमासाठी शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ अर्जुन गुंडे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक प्रतिभा संगमनेरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे, रवींद्र परदेशी, वर्षा फडोळ आदींसह अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

स्पर्धांना आज ब्रेक

तीन दिवसीय स्पर्धेंत गुरूवारी स्पर्धेंचे उदघाटन झाले. शुक्रवारी विविध स्पर्धा होऊन शनिवारी (ता.4) समारोप होता.

परंतू राज्यभरातील जिल्हा परिषदांमधील मुख्यकार्यकारी अधिकारी, अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी, विभागप्रमुख यांची परिषद पुणे येथे आयोजीत केलेली आहे. त्यामुळे शनिवारी स्पर्धांना ब्रेक असून रविवारी (ता.5) पारितोषिक वितरण व समारोप होणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India-Russia Relations: ''भारत-रशिया मिळून दहशतवादाला चोख उत्तर देणार'', परराष्ट्र मंत्र्यांचा रशियातून इशारा

Farmer ID : फार्मर आयडी नोंदणीत गोंधळ; सातबारा एकाचा, आधार लिंकिंग दुसऱ्याचे!

MP Nilesh Lanke : पावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी; खासदार नीलेश लंके यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

Maharashtra Latest News Update: विधीमंडळाच्या सार्वजनिक उपक्रम समितीची खोपोली ते कुसगाव या मिसिंगलिंक प्रकल्पास भेट

Mokhada News : जगण्यासाठी छळ, मरणानंतर यातना; मोखाड्यातील आदिवासींच्या नशिबाचे दुष्टचक्र

SCROLL FOR NEXT