silence during office hours in Zilla Parishad department  esakal
नाशिक

Nashik News: कार्यालयीन वेळात ZP कर्मचारी निवडणूक प्रचारात व्यस्त! नियमित कामकाजावरही होत आहे परिणाम

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : गत दोन आठवड्यांपासून बदल्यांच्या नावाखाली असणारे जिल्हा परिषद कर्मचारी आता जिल्हा सरकारी व परिषद सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या कामात व्यस्त आहे.

कार्यालयीन वेळात मुख्यालयातील बहुतांश कर्मचारी निवडणुकीच्या प्रचारात दिसत आहे. कर्मचारी टेबलावर हजर राहत नसल्याने प्रशासनाचे कामकाज काहीसे ठप्प झाले आहे. (ZP staff busy with election campaign during office hours Regular operations also affected Nashik News)

जिल्हा परिषदेच्या कर्मचारी नियमित बदली प्रक्रीया पार पडली असून, यात कर्मचारी वर्गाच्या बदल्या झाल्या. त्यानंतर अंतर्गत बदल्या झाल्या या प्रक्रियेत अनेक कर्मचारी गुंतले होते. बदल्यांच्या नावाखाली तीन आठवडे कर्मचाऱ्यांनी घालविले.

कोणतेही काम सांगितल्यास बदल्या असल्याचे कारण पुढे केले जात होते. परिणामी प्रशासकीय कामकाजावर याचा परिणाम झाला. बदली प्रक्रीया आटोपती झाल्यानंतर कर्मचारी टेबलांवर बसून कामकाज करतील, अशी अपेक्षा होती.

परंतु, कर्मचारी बॅंकेची निवडणूक सुरू आहे. यात, अर्ज दाखल झाले असून २० जूनपर्यंत माघारीची मुदत आहे. माघारीनंतर, प्रचार सुरू होणे अपेक्षित आहे. मात्र, यंदा जिल्हा परिषदेतील कर्मचारी वर्गात दोन गट पडल्याने दोन्ही गट रिशीला पेटले आहे.

त्यामुळे दोन्ही गटाने आतापासूनच प्रचाराला सुरवात केली आहे. निवडणूक असल्याने प्रचार करण्यास प्रशासनाचा कोणताही विरोध नाही. परंतु, कर्मचारी वर्गाकडून शासकीय वेळेत प्रचार सुरू असल्याचे काही दिवसांपासून दिसत आहे.

कार्यालयात हजेरी लावून अनेक कर्मचारी अन्य शासकीय कार्यालयांमध्ये प्रचार करताना दिसत आहे. काही कर्मचारी अर्धादिवस कामकाज करून, गायब होत आहे. तर, काही कर्मचारी मुख्यालयात केवळ हजेरीसाठी येत असल्याचे बघावयास मिळत आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कर्मचारी टेबलावर नसल्याने विभागांमध्ये अनेक कामात अडचणी येत आहे. प्राप्त निधी व झालेला खर्च याचा ताळमेळ अंतिम करायचा आहे.

परंतु, कर्मचारी नसल्याकारणाने हा ताळमेळ अंतिम होऊ शकलेला नाही. याशिवाय अनेक नियमित कामातही कर्मचारी गैरहजरीचा फटका बसत आहे. यावर अनेक विभागप्रमुखांनी नाराजी व्यक्त केली आहे.

जिल्हा परिषद वाऱ्यावर

प्रशासक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी दौऱ्यावर असल्यास, बैठकीसाठी मुंबईत गेलेले असल्यास मुख्यालयात कर्मचारी राहत नसल्याचे अनेकदा दिसून आले आहे.

मुख्यकार्यकारी अधिकारी नसल्याचा फायदा घेत अनेक कर्मचारी गायब राहत असल्याचे चित्र यापूर्वी बघावयास मिळाले आहे. त्यामुळे मुख्यकार्यकारी अधिकारी नसल्यावर, जिल्हा परिषद वाऱ्यावर असल्याचे चित्र काही दिवसांपासून तयार झाले आहे.

"शासकीय वेळेत कर्मचाऱ्यांना कार्यालयात पूर्णवेळ उपस्थित राहून काम करणे अपेक्षित आहे. कार्यालयीन वेळात प्रचार करण्यास कोणतीही मुभा कर्मचाऱ्यांना नसून तसा शासकीय आदेश देखील नाही."

- आनंद पिंगळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन विभाग जि.प.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Monorail Breakdown Update : चेंबूरमध्ये मोनोरेलमध्ये बिघाड, ३०० हून अधिक प्रवाशांची सुटका, ६ जणांना त्रास

AUS vs SA, 1st ODI: केशव महाराजच्या फिरकीने ऑस्ट्रेलियाचे कंबरडं मोडलं; ५ विकेट्स घेत द. आफ्रिकेचा विक्रमी विजय

Operation Sindoor : शालेय अभ्यासक्रमात भारतीय लष्कराची शौर्यगाथा सांगणार! 'ऑपरेशन सिंदूर' आता अभ्यासक्रमात शिकवणार...

Mumbai-Pune Latest Rain Updates Maharashtra: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर

World Cup 2025 India Squad: वर्ल्ड कपच्या भारतीय संघात शफाली वर्माला स्थान का नाही? निवड समिती अध्यक्षांनी सांगितलं खरं कारण

SCROLL FOR NEXT