Transfer
Transfer esakal
नाशिक

ZP Staff Transfer : ठरलं..16 मे पासून कर्मचाऱ्यांच्या बदल्या; असे आहे बदल्यांचे वेळापत्रक...

सकाळ वृत्तसेवा

Nashik News : मे महिना उजाडून देखील नाशिक जिल्हा परिषदेकडून कर्मचारी बदल्यांबाबत वेळापत्रक तयार केलेले नाही त्यामुळे बदल्यांबाबत कर्मचारी वर्गात संभ्रमावस्था याबाबतचे ‘सकाळ’ ने वृत्त प्रसिद्ध करताच प्रशासनाने तातडीने बुधवारी (ता.३) कर्मचारी बदल्यांचे वेळापत्रकाची फाइल फिरवली अन त्यास मंजुरी मिळाली.

येत्या १६ ते १९ मे दरम्यान कर्मचारी बदली प्रक्रीया होणार आहे. (zp staff transfer process will take place between May 16 and 19 nashik news)

गत दोन वर्ष कोरोना संकटात गेल्याने कर्मचारी बदली प्रक्रीया झाली नव्हती. गतवर्षी बदली प्रक्रियांची प्रशासनाने तयारी केली खरी. परंतु, आदिवासी व बिगर आदिवासींतील अनुशेषामुळे जिल्हा परिषद कर्मचारी बदल्या होऊ शकलेल्या नाहीत. मार्च-एप्रिल महिन्यात कर्मचारी बदल्यांबाबत शासनाकडून योग्य त्या सूचना, आदेश येतात.

यंदा मात्र, आदेश न आल्याने प्रशासनाने शासन आदेशाप्रमाणे बदली प्रक्रियेची तयारी केली. त्यासाठी सर्व विभागांकडून सेवाज्येष्ठता यादीची माहिती मागविली आहे. मात्र, त्यापुढील कोणताही कार्यवाही होत नसल्याने बदल्यांबाबत पुन्हा संभ्रमावस्था तयार झाली.

जळगावसह इतर जिल्हा परिषदांनी कर्मचारी बदल्यांबाबत पत्र काढत, वेळापत्रक देखील जाहीर केले. परंतु नाशिक जिल्हा परिषदेने २ मे उजाडून देखील वेळापत्रक तयार केले नसल्याने कर्मचारी वर्गात अस्वस्थता निर्माण झालेली आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

याबाबतचे ‘सकाळ’ ने वृत्त प्रसिद्ध केले. वृत्त प्रसिद्ध होताच सामान्य प्रशासन विभागाकडून कर्मचारी बदल्यांबाबतची रखडलेली फाइल तत्काळ फिरली. दुपारी सदर फाइल मंजुरीसाठी मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याकडे गेली. सायंकाळी सदर फाईलीस मंजुरी मिळाली. त्यानंतर, विभागाने सर्व विभागास पत्र देत, वेळापत्रकाप्रमाणे कार्यवाहीच्या सूचना केल्या.

गत तीन वर्षापासून बदल्या झालेल्या नसल्याने मुळातच कर्मचारी वर्गात नाराजीची वातावरण आहे. तीन वर्ष वा त्याहून अधिक काळापासून कर्मचारी आदिवासी भागात काम करत आहे. त्यामुळे या भागातील कर्मचाऱ्यांना बदल्यांची प्रतिक्षा लागलेली आहे. मात्र, प्रशासनाकडून वेळापत्रक येत नसल्याने त्यांची घालमेल वाढली होती.

असे आहे बदल्यांचे वेळापत्रक

तारीख वेळ विभाग

१६ मे २०२३ : सकाळी १० ते २ सामान्य प्रशासन, दुपारी २.३० ते ४ अर्थ विभाग, दुपारी ४ ते ५.३० कृषी विभाग

१७ मे २०२३ : सकाळी १० ते २ ग्रामपंचायत विभाग दुपारी २.३० ते ६ महिला बालकल्याण विभाग

१८ मे २०२३ : सकाळी १० ते १२ शिक्षण विभाग (शिक्षक संवर्ग वगळून) दुपारी १२ ते २ बांधकाम विभाग १, २ आणि ३ दुपारी ४ ते ५ पशुसंवर्धन विभाग सायंकाळी ५ ते ६ ग्रामीण पाणी पुरवठा विभाग

१९ मे २०२३ : सकाळी १० ते ४ आरोग्य विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Molestation case : राजभवनातल्या तीन अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल; महिलेच्या आरोपानंतर पोलिसांची मोठी कारवाई

Fact Check: दागिने चोरल्यामुळे पंतप्रधान मोदींना घरातून हाकलण्यात आल्याचा दावा खोटा; वृत्तपत्राचे व्हायरल फोटो खोटे

Dindori Lok Sabha Constituency : गुरुजींसमोर ताईंना राजकीय खिचडी शिजवण्याचे आव्हान; दिंडोरी कांटे की टक्कर

Bibhav Kumar Detained: स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या मारहाणीप्रकरणी केजरीवालांच्या पीएला पोलिसांनी घेतले ताब्यात

Share Market Closing: शेअर बाजार तेजीसह बंद; सेन्सेक्स 74,005 वर, कोणते शेअर्स वधारले?

SCROLL FOR NEXT