nashik-municipal-corporation esakal
नाशिक

नाशिक मधील उड्डाणपुलांच्या कागदपत्रांची दडवादडवी; भाजप नगरसेवक मुकेश शहाणे यांचा आरोप

स्पर्धा होऊन प्राकलन दरापेक्षा कमी दर व गुणवत्ताप्राप्त कंपनीला काम देता आले असते.

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल येथे अडीचशे कोटी रुपये खर्चाच्या वादग्रस्त उड्डाणपुलाची कागदपत्रे देण्यास बांधकाम विभागाकडून (PWD)दडवादडवी होत असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मुकेश शहाणे यांनी केला आहे. सिडकोतील सिटी सेंटर मॉल ते त्रिमूर्ती चौक व मायको सर्कल ते सिटी सेंटर मॉलदरम्यान उड्डाणपूल बांधला जात आहे. उड्डाणपुलासाठी राबविलेल्या निविदा पद्धतीमुळे सिमेंटसह अन्य साधनसामग्रीवर स्टार रेट लावल्याने तीनशे कोटींच्या पुढे किंमत जाण्याची शक्यता आहे. त्यातून महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार आहे. (BJP corporator Mukesh Shahane's allegation on nashik flyovers docyments)

या संदर्भात स्थायी समिती सभेत प्रश्न उपस्थित केले. मात्र, प्रशासनाकडून उत्तरे देण्यात आली नाहीत. या दोन्ही उड्डाणपुलांची मूळ निविदाप्रक्रिया विशिष्ट ठेकेदाराला काम देण्यासाठी राबविण्यात आली असून, यात महापालिकेला फक्त दोन निविदा प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे निविदाप्रक्रियेस मुदतवाढ दिली असती, तर बांधकाम क्षेत्रातील अनुभवी व नामवंत कंपन्यांना सहभागी होता आले असते. स्पर्धा होऊन प्राकलन दरापेक्षा कमी दर व गुणवत्ताप्राप्त कंपनीला काम देता आले असते.

मात्र, ही प्रक्रिया जाणीवपूर्वक टाळण्यात आल्याने बांधकाम विभागाचे कामकाज संशयास्पद आहे. एका विशिष्ट मक्तेदाराला कार्यारंभ आदेश दिले गेले. त्यानंतर मूळ निविदेत सोयीने बदल करताना एम ४० ऐवजी एम ६० या प्रतीचे सिमेंट वापरण्याचे कारण देत मोठ्या प्रमाणात फेरबदल केला जात आहे. त्यातून महापालिकेचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होणार असल्याचे निवेदन नगरसेवक शहाणे यांनी आयुक्तांना दिले.मक्तेदाराकडून एम ४० ग्रेड सिमेंटमुळे उड्डाणपुलास तडे जाणार असल्याचा दावा केला जात असेल, तर निविदापूर्व बैठकीत आक्षेप का घेतला नाही, असा सवाल नगरसेवक शहाणे यांनी केला.

vकागदपत्रांची दडवादडवी

न्यायालयीन प्रक्रियेसाठी बांधकाम विभागाकडे अनेकदा कागदपत्रांची मागणी करण्यात आली. स्थायी समितीच्या सभेत बांधकाम विभागाला कागदपत्रे उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. मात्र, अद्यापही कागदपत्रे दिली नाहीत. त्यामुळे शहाणे यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

उड्डाणपूल झालेच पाहिजे, यात दुमत नाही, मात्र चुकीच्या पद्धतीने पूल उभारल्यास व त्यातून भविष्यात काही दुर्घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार? त्यामुळे आतापासूनच खबरदारी घेणे महत्त्वाचे आहे.

-मुकेश शहाणे, नगरसेवक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Honey Trap Miraj : बुलाती है मगर जानेका नहीं! सोशल मीडियाचा नाद लावून पोरं बाद करणारी टोळी, मिरजेत फोटो, व्हिडिओ काढून ब्लॅकमेल; कोल्हापूर कनेक्शन

Jalna Crime: पोलिस रेकॉर्डवरील एकाचा खून; जालन्यात थरार, जमिनीच्या वादातून चौघांकडून सशस्त्र हल्ला

नेते अन्‌ कार्यकर्त्यांनो सावधान ! 'साेलापुरात बाईक रॅली काढाल तर गुन्हा दाखल'; पोलिस आयुक्तांचे काय आहेत नियम?

Solapur News: 'साेलापूर जिल्ह्यातील ७८ हजार शेतकऱ्यांचे फार्मर आयडी प्रलंबित'; शेतकऱ्यांना अतिवृष्टी भरपाई मिळेना..

Tamhini Ghat Accident एकमेकांचे जिवलग मित्र… मिळून थार घेतली; ताम्हिणी घाटात मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची हृदयद्रावक करुणकथा

SCROLL FOR NEXT