Nandurbar forest department  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : नवापूर वन विभागाने लाकूडसाठा पकडला

सकाळ वृत्तसेवा

नवापूर : वन विभागाच्या पथकाने सोमवारी (ता. ३०) शहराजवळ असलेल्या नवरंग रेल्वे गेटजवळ तपासणी केली असता अवैध लाकडाचा साठा, ट्रक व रेल्वे गेटच्या बाजूला मिळाला. चार लाखांच्या मुद्देमालासाह आरोपीला पकडण्यात आले असून, गुन्हा दाखल करण्यात आला.

वन विभागाच्या कर्मचाऱ्यानी शहराजवळ असलेल्या नवरंग रेल्वे गेटजवळ तपासणी केली असता त्यात पंचरास जळाऊ लाकूड अवैध वाहतूक करताना ट्रक (जीजे १८, यू ७०८७) मिळून आला. या गाडीत ७० हजारांचा नऊ घनमीटर माल मिळून आला.

हेही वाचा : T+1 Settlement मुळे वाढेल शेअर बाजारातली उलाढाल

रेल्वे गेटच्या बाजूस परत तपासणी केली असता सागवानी लाकडाचे १८७ नग मिळून आले. त्याची किंमत एक लाख ४४ हजार ५९५ रुपये असून, ४.७१३ घनमीटर आहे. हा माल खासगी वाहनाने नवापूर वन विभागाच्या आगारात जमा केला.

एकूण मुद्देमाल चार लाख १४ हजार ५९४ रुपयांचा आहे. संशयित आरोपी तौफिक अमीर काझी (वय ३२, ह.मु. नवापूर) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

कारवाईत वनक्षेत्रपाल मंगेश चौधरी, स्नेहल अवसरमल यांच्यासह वनपाल भिवाजी दराडे, संजय बडगुजर, सुनीता पाटील, शीतल तोरवणे, विजय तेले, वनरक्षक सतीश पदमर, कल्पेश अहिरे, रामदास पावरा, कमलेश वसावे, इलान गावित, विकास शिंदे, संतोष गायकवाड, कविता गावित, वाहनचालक आबा न्याहळदे, बाळा गावित यांचा सहभाग होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aaditya Thackeray: आता महाराष्ट्र बंद पाडणार, आदित्य ठाकरेंचा सरकारला इशारा; थेट पोलीस व्हॅनवर चढून...

IND vs WI, 3rd T20I: अभिषेक शर्माची १८ चेंडूत फिफ्टी अन् रचले तब्बल तीन विश्वविक्रम; सूर्यकुमारलाही टाकलं मागे

Kolhapur Leopard Sighting : कोल्हापूर वेशीवर पुन्हा बिबट्या; शिंगणापूर मार्गावर बिबट्याचे दर्शन, वनविभागाकडून शोधमोहीम

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

CJP Leaders Serious Allegation : "आमचे मोबाईल घेतले होते, त्यावेळी त्यात खोटे पुरावे घातल्याची आम्हाला भीती!"; सुटकेनंतर सीजेपीच्या नेत्यांचा पोलिसांवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT