Liquor storage vehicle seized by Nawapur police. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Crime News : नवापूर पोलिसांनी कारसह पकडला अवैध मद्यसाठा

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Crime News : तालुक्यातील आमपाडा चौफुली ते थुंवा गावादरम्यान रस्त्यावर चारचाकीची झडती घेतली असता त्यात एक लाख ३० हजार ५८० रुपयांचे देशी-विदेशी मद्य व बिअरचा मुद्देमाल आढळला. (Navapur police caught illegal liquor stocks with car nandurbar crime news)

या मालासह दोन लाख २५ हजारांची रुपये किमतीची कार (जीजे ०३, एचके ५२२६) नवापूर पोलिसांनी ताब्यात घेतली. संशयित नीलेशभाई ऊर्फ टाइसन रमणभाई कोकणी याला ताब्यात घेऊन नवापूर पोलिसांत गुन्हा दाखल केला.

पोलिस अधीक्षक पी. आर. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नवापूर पोलिस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक ज्ञानेश्वर वारे यांनी ही कारवाई केली. पोलिस शिपाई समाधान केंद्रे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दारूबंदी अधिनियम कलमान्वये नवापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराजसिंग परदेशी करीत तपास आहेत.

पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक युवराजसिंग परदेशी, हवालदार दिनेशकुमार वसुले, पोलिस नाईक सुरेंद्र पवार, पोलिस शिपाई समाधान केंद्रे, किशोर वळवी यांच्या पथकाने कारवाई केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asian Games, Archery: भारताच्या लेकींचा सुवर्णवेध! चीनचा धुव्वा अन् थेट वर्ल्ड रेकॉर्ड करत जिंकलं भारतासाठी सातवं गोल्ड मेडल

Pradeep Purnekar Murder : प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणात दोन संशयित ताब्यात, चौघांचा शोध सुरु; कुटुंबीयांचे शिंदे सेनेच्या नेत्यावर गंभीर आरोप

प्रज्ञाविकासाचा राजमार्ग : उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती : इन्स्पायर-एसएचई

Latest Marathi News Live Update : मुंबईतील १४ फुटांवरील झोपड्यांवरील कारवाईला राष्ट्रवादीचा विरोध

IND vs WI, 2nd ODI: नितीश रेड्डीचा प्रयोग फसला, नबीचं होणार पदार्पण? भारताला मालिका खिशात घालण्याची संधी, कुठे पाहाणार सामना?

SCROLL FOR NEXT