Anil Patil
Anil Patil esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Politics News : अनिल पाटील यांना नंदुरबारचे पालकत्व; राष्ट्रवादी काँग्रेस-शिंदे शिवसेनेला मिळणार बळ

धनराज माळी

Nandurbar Politics News : नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याकडून काढून घेत त्यांना भंडारा जिल्हा, तर नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री अनिल भाईदास पाटील यांची वर्णी लागली आहे.

राज्यातील सत्तासंघर्षातील पक्षांतर्गत शह-काटशहाच्या राजकारणात नंदुरबारच्या स्थानिक मंत्र्यांकडून जिल्ह्याचे पालकत्व काढून घेतल्याने नवीन पालकमंत्र्यांमुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नक्कीच बळ मिळेल, त्यासोबतच शिंदे शिवसेनेलाही सोयीचे ठरणार आहे.(NCP Shinde Shiv Sena will gain strength nandurbar news)

राज्यातील तीन पक्षांच्या सरकारमध्ये जो-तो आपल्या सोयीचे राजकारण करीत आहेत. त्यातूनच शह-कटशहाचे राजकारण सुरू असल्याचे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी (ता. ४) जाहीर केलेल्या १२ पालकमंत्र्यांच्या नियुक्ती यादीत नंदुरबारच्या पालकमंत्रिपदी अनिल पाटील यांची वर्णी लावली, तर नंदुरबार पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांना भंडारा जिल्ह्याचे पालकत्व सोपविण्यात आले.

या बदलामुळे अनिल पाटील यांची सोय झाली. त्यांच्यासोबतच त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही येथे बळ मिळणार आहे. एवढेच नव्हे तर शिंदे शिवसेनेचे नेते माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे नूतन पालकमंत्री अनिल पाटील यांच्याशी अत्यंत जवळचे संबधच नव्हे तर निकटवर्तीय मानले जातात.

राज्यात भाजप-शिंदे शिवसेनेचे सरकार असले तरी नंदुरबार जिल्ह्याच्या राजकारणात डॉ. विजयकुमार गावित व चंद्रकांत रघुवंशी यांच्यातील राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. त्यामुळे या राजकीय संघर्षात एकमेकांच्या कामात अडथळे आणणे साहजिकच आहे.

पालकमंत्रिपद डॉ. गावित यांच्याकडे असल्यामुळे नंदुरबार शहर विकासासाठी अनेक गोष्टींमध्ये माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांना अडचणीचे ठरत होते. त्यातून अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत तक्रारीही झाल्याची चर्चा होती. त्यातच आजच्या १२ पालकमंत्र्यांच्या नियुक्ती व फेरबदलामध्ये नंदुरबारचे पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांचा बळी गेल्याची चर्चा आहे.

जिल्हा विकासाचे व्हिजन बारगळणार

एखाद्या खात्याच्या मंत्र्यापेक्षाही जिल्हा पालकमंत्रिपद त्या जिल्ह्याच्या विकासासाठीचा मोठा दुवा असतो. जिल्ह्यात काय विकास साधावा ते साधणे सोपे जाते. त्यामुळे डॉ. विजयकुमार गावित यांनी नंदुरबार जिल्ह्याला इतर विकसित जिल्ह्यांमध्ये समावेश होईल, असे व्हिजन तयार करण्याचे काम सुरू केले होते.

ते त्यांनी वेळोवेळी जाहीरही केले आहे. मात्र त्या विकास व्हिजनासाठी आता त्यांच्याकडे पालकत्व नसल्याने त्यांना त्यांच्या दृष्टीने विकासाचे व्हिजन साधणे सध्या तरी अडचणीचे ठरणार आहे. त्यासाठी नूतन पालकमंत्री अनिल पाटील व डॉ. गावित यांच्यातील समन्वयावर पुढील वाटचाल अवलंबून राहणार आहे.

राष्ट्रवादीला बळ मिळणार

मंत्री पाटील यांच्याकडे नंदुरबारचे पालकत्व आल्याने त्या माध्यमातून त्यांचा जिल्ह्याशी सतत संपर्क राहणार आहे. त्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कामातही त्यांना लक्ष घालता येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी-कार्यकर्त्यांची कामे होतील. त्यासोबतच जनतेची कामे होतील.

पर्यायाने राष्ट्रवादी काँग्रेसला बळ मिळेल. अनिल पाटील यांच्याशी असलेल्या संबंधांमुळे शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनाही जनतेची कामे करणे सोपे होणार आहे. त्यांच्यामुळे शिवसेनेच्या माध्यमातून जनतेची कामे होतील. म्हणून श्री. पाटील यांची पालकमंत्री म्हणून नियुक्ती राष्ट्रवादी काँग्रेस व शिंदे शिवसेनेच्या पथ्यावर पडल्याची चर्चा सुरू झाली आहे.

नवा भिडू, नवे राज..!

पालकमंत्रिपदी अनिल पाटील यांच्या नियुक्तीचे राष्ट्रवादी काँग्रेस-शिंदे शिवसेना व इतर डॉ. गावित विरोधकांकडून जोरदार स्वागत केले जात आहे. श्री. पाटील यांची नियुक्ती शिवसेनेच्या (शिंदे गट) पथ्यावर पडली आहे. नंदुरबार जिल्ह्यासाठी ते नवे पालकमंत्री असणार आहेत.

त्यामुळे त्यांच्या कामाची पद्धत, त्यांचे नियोजन, अधिकाऱ्यांवरची पकड, जिल्ह्याच्या विकासासाठीची आवश्‍यक माहिती या गोष्टींचा अभ्यास नक्कीच करावा लागणार आहे. त्यामुळे नवा भिडू नवे राज आता त्यांच्या माध्यमातून सुरू होणार आहे. त्यांना जिल्ह्याच्या विकासकामांबाबत शिवसेना नेते तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ebrahim Raisi: हेलिकॉप्टर अपघातात इराणचे अध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्यासह परराष्ट्र मंत्र्याचा मृत्यू- रिपोर्ट

Shivam Dube : शिवम दुबेला लागले ग्रहण... T20 World Cupसाठी संघात निवड झाल्यानंतर 5 सामन्यात केल्या फक्त इतक्या धावा

Masala Omelette Recipe : नाश्त्यामध्ये झटपट बनवा मसाला ऑम्लेट, चवदारही लागणार अन् पोटही भरणार.!

Stock Market: लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर शेअर बाजार कसा असेल? पंतप्रधान मोदींनी वर्तवले भाकित

Maharashtra Lok Sabha Phase 5 Election : पाचव्या टप्प्यात 49 जागांवर मतदान! राजनाथ सिंह, राहुल गांधींसह अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

SCROLL FOR NEXT