Death News esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : हाडाखेड येथे NDA प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचा बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : राष्ट्रीय संरक्षण अकादमी (एनडीए)च्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना १५ जूनला सायंकाळी हाडाखेड (ता. शिरपूर) येथे घडली.

हिमांशू शरद चौधरी (वय २१, रा. जापोरा, ता. शिरपूर) असे मृत तरुणाचे नाव आहे. तो पुणे येथील एनडीएमध्ये प्रशिक्षण घेत होता. करवंद धरणाच्या हाडाखेड येथील जलक्षेत्रात तो मित्रांसह गेला होता. (NDA trainee officer drowned in Hadakhed Dhule News)

तेथे पोहण्यासाठी तो पाण्यात उतरला. उत्तम जलतरणपटू असल्याने तो खोल पाण्यात गेला. मात्र मासेमारीसाठी लावलेल्या जाळ्यात तो अडकला. धडपड करूनही पाण्याबाहेर येण्यात अपयश आल्याने तो बुडाला.

त्याच्या मित्रांनी आकांत केल्यानंतर परिसरातील लोक जमले. त्यांनी हिमांशूचा मृतदेह बाहेर काढला. दहिवद (ता. शिरपूर) येथील सामाजिक कार्यकर्ते मयूर राजपूत व सहकाऱ्यांनी मदतकार्य केले.

जापोरा येथे शुक्रवारी (ता. १६) अंत्यसंस्कार करण्यात आले. तो ताराचंद चौधरी यांचा नातू, तर प्रा. शरद चौधरी यांचा पुत्र होय. वर्षभरापूर्वी त्याची एनडीएसाठी निवड झाली होती. सुटीत तो घरी आला होता. या घटनेमुळे जापोरा गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

IND vs WI 2nd ODI : शुभमन गिलने झळकावले इतिहासातील वेगवान द्विशतक! विक्रमांचा पाऊस अन् टीम इंडियाचा वर्ल्ड रेकॉर्ड

SCROLL FOR NEXT