crop loan esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : 5 एप्रिलपासून नवीन पीक कर्जवाटप

सकाळ वृत्तसेवा

धुळे : धुळे व नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने खरीप हंगामासाठी ५ एप्रिलपासून पीककर्ज (Crop Loan) वितरणाची तयारी सुरू केली आहे. (New crop loan distribution from 5th April Dhule News)

त्यानुसार जिल्हास्तरीय तांत्रिक समितीने पीक कर्जदर निश्चित केला आहे. या विषयावर बँकेच्या संचालक मंडळाच्या सभेतही चर्चा झाली.

त्यानुसार लवकरच पीककर्ज वितरणाला सुरवात होईल, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष राजवर्धन कदमबांडे यांनी दिली.जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या अध्यक्षतेत जिल्हास्तरीय तांत्रिक समितीची सभा नुकतीच झाली. त्या वेळी नवीन हंगामासाठी पीक कर्जदर निश्चित करण्यात आला. बँकेच्या संचालक मंडळाने पीक कर्जदराला मान्यता दिली आहे.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

त्यानुसार सोयाबीनला ५० हजार, जिरायत कपाशीसाठी ५५ हजार, बागायत कपाशीसाठी ७५ हजार, मिरचीसाठी ६२ हजार ५००, केळीसाठी एक लाख, केळी टिश्युकल्चरसाठी दीड लाख, पपईसाठी ८७ हजार, पूर्व हंगामी उसासाठी एक लाख १० हजार, रोपलागवडीसाठी सव्वा लाख, खोडव्यासाठी ८५ हजार असा प्रतिहेक्टर पीककर्ज दर निश्चित झाला आहे.

धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात दर सारखेच आहेत. विविध कार्यकारी सोसायटी, आदिवासी विकास संस्थांकडून मर्यादा पत्रक तयार करून त्याला संचालक मंडळाकडून मंजुरी देण्यात येत आहे. तसेच ५ एप्रिलपासून नवीन पीककर्ज वाटप सुरू होईल. त्यामुळे जिल्हा सहकारी बँकेच्या थकबाकीदारांनी कर्जाचा भरणा ३१ मार्चपर्यंत करावा.

प्रथम कर्ज भरणा केलेल्या सभासदांना प्रथम कर्जवाटप करण्यात येईल, असेही अध्यक्ष कदमबांडे यांनी सांगितले. बँकेच्या प्रशासकीय पातळीवर पीककर्जवाटपासाठी वेगात पूर्वतयारी केली जात असल्याचेही श्री. कदमबांडे, सीईओ धीरज चौधरी यांनी नमूद केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shirur Politics : आमदार माऊली कटके यांचा नगर परिषदेच्या कारभारात हस्तक्षेप नाही; नगराध्यक्षा ऐश्वर्या पाचर्णे यांनी आरोप फेटाळले

Spinach Egg Rice: रविवारच्या लंचसाठी बेस्ट! अवघ्या २० मिनिटांत बनवा प्रोटीनयुक्त गार्लिक पालक एग राईस; चवही जबरदस्त!

Todays Horoscope : आजचा दिवस ५ राशींसाठी ठरणार खास! धनलाभासह रखडलेली कामं होणार पूर्ण; वाचा १२ राशींचं भविष्य

U12 Cricket: अचिव्हर्स अकादमीने उंचावला परिवर्तन कप! यंग बॉइज क्लबचा धुव्वा; अनिश विद्युत सर्वोत्तम खेळाडू

Beed News : नवीन वर्षात जिल्हा रुग्णालयाची नवी इमारत ठरणार आरोग्यसेवेचे केंद्र; दीड महिन्यात मिळणार जिल्हा रुग्णालयात मोफत एमआरआय सेवा

SCROLL FOR NEXT