Kishore Kale, Satish Ghotekar and colleagues present at the spot during investigation in Nikita murder case. esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : मारेकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल; निकिता पाटील खून प्रकरणाला कलाटणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : येथील नकाणे रोडवरील विघ्नहर्ता हॉस्पिटलजवळील बालाजीनगरात बुधवारी (ता. २३) सायंकाळी सहाच्या सुमारास निकिता कल्याण पाटील (वय २१) या महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा चाकूने गळा चिरून निर्घृन खून झाल्याची घटना घडली.

मृत तरुणीच्या घरामागे काटेरी झाडीझुडपात २४ वर्षीय तरुणाचा मृतदेह गुरुवारी सकाळी आढळला. (Nikita Patil murder case overturned dhule crime news)

त्याने विषप्राशन करत आत्महत्या केल्याचे समोर आले. तो निकिताचा मारेकरी असावा, असा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे या खून प्रकरणाला कलाटणी मिळाली आहे. निकिताच्या खुनाची घटना ताजी असताना तिच्या घरामागे अनिकेत वाल्मीक बोरसे (वय २४, महालेनगर, मोगलाई, साक्री रोड, धुळे) याचा मृतदेह आढळला. अनिकेतने विषारी औषध प्राशनातून आत्महत्या केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले.

पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करत अनिकेतचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दाखल केला. निकीताचा खून आणि अनिकेत याची आत्महत्या या दोन्ही घटनांचा परस्पर काही संबंध आहे काय याचा सखोल तपास पोलिस यंत्रणा करीत आहे. तसेच निकिताच्या खून प्रकरणात संशयित महेश मराठे याचाही पोलिस यंत्रणा शोध घेत आहे.

प्रेमसंबंधास नकारातून निकिताचा खून झाल्याचे मानले जाते. या खून प्रकरणी नकाणे गावातील संशयित महेश मराठे याच्याविरुद्ध निकिताचा भाऊ अनिकेत (वय २३) याने दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल झाला.

असे असताना गुरुवारी सकाळी निकिताच्या घरामागे जवळच अनिकेत बोरसे याचा मृतदेह आढळल्याने त्याने निकिताचा खून केल्यानंतर विषारी औषध प्राशनातून आत्महत्या केली असावी, असा पोलिसांना संशय आहे. दुसरीकडे महेश मराठे हा पसार झाला आहे. त्यामुळे निकिताच्या खुनामागील गूढ कायम आहे.

निकिताच्या भावाने फिर्यादीत म्हटले आहे, की महेश मराठे याच्याशी संबंध तोडल्यानंतरही तो बहीण निकिताचा पाठलाग सोडत नव्हता. माझ्यासोबत प्रेमसंबंध कायम ठेव, असा आग्रह तो निकिताकडे धरत होता. याबाबत तिने भाऊ अनिकेतकडे महेशची तक्रार केली.

त्यानुसार निकिताचा भाऊ अनिकेत व विनोद मोरे यांनी महेशला गाठून बहिणीचा पाठलाग करू नको, असे सांगत त्याला मारहाण केली. यानंतर बुधवारी सायंकाळी निकिता घरात एकटी असताना तिचा अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणावरून चाकूने गळा चिरून निर्घृण केल्याची थरारक घटना घडली.

घटनास्थळी गुरुवारी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपअधीक्षक सचिन हिरे, एलसीबीचे निरीक्षक दत्तात्रय शिंदे, देवपूरचे पोलिस निरीक्षक सतीश घोटेकर यांनी पाहणी केली. निकिताचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला.

नंतर मृत अनिकेत बोरसे याच्या मृतदेहाच्या तपासणीवेळी त्याच्या कपड्यांवर रक्ताचे शिंतोडे पोलिसांना दिसले. अनिकेत हा पुणे येथे एका गॅस कंपनीत नोकरीत होता. त्यालाही निकिताने प्रेमसंबंधास नकार दिल्याची चर्चा घडत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT