Collection of two quintals of Nirmala at the warehouse
Collection of two quintals of Nirmala at the warehouse  esakal
उत्तर महाराष्ट्र

कोठार येथे निर्माल्य संकलन मोहीम; तब्बल पावणे 2 क्विंटल निर्माल्याचे संकलन

सकाळ वृत्तसेवा

तळोदा (जि.नंदुरबार) : तालुक्यातील रोझवा पुनर्वसन येथील जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी तसेच तळोदा समाजकार्य महाविद्यालयातील एमएसडब्ल्यू व बीएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांनी संयुक्तरित्या कोठार (ता. तळोदा) येथील लघुसिंचन प्रकल्पाचा किनाऱ्यावर गणेश विसर्जनानंतर जमा झालेल्या निर्माल्याचे सोमवारी (ता. १२) संकलन केले. यावेळी तब्बल पावणेदोन क्विंटल इतके निर्माल्य संकलन करण्यात आले. (Nirmalya collection campaign at Kothar Collection of nearly 2 quintals of Nirmalya nandurbar Latest Marathi News)

कोठारचा (ता. तळोदा) आसपासच्या परिसरातील नागरिक गणरायाच्या विसर्जनासाठी कोठार येथील प्रकल्पाला पसंती देतात. विसर्जनानंतर तलावाच्या किनारी मोठ्या प्रमाणावर निर्माल्य जमा होते. या पार्श्वभूमीवर रोझवा पुनर्वसन जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक मणीलाल नावडे व समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. नीलेश तायडे यांच्या नेतृत्वाखाली निर्माल्याचे संकलन करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात आली.

रोझवा पुनर्वसन शाळेतील विद्यार्थी तसेच एमएसडब्ल्यूचे भारती पवार, रिता गुलाले, प्रशांत मराठे, अजय पावरा, निकिता जोशी, गायत्री माळी, जयंत भावसार, बाळकृष्ण निकुंभे, सपना नगराळे, रंगू बागूल, अनिल पाटील, हर्षल वळवी, बबलू गांगुर्डे आणि बीएसडब्ल्यूचे पायल धनगर, वृक्षाली मराठे, संजना कासार, अश्विनी गवळी या विद्यार्थ्यांनी स्वच्छता मोहीम राबवली.

विद्यार्थिनींनी तलावात विसर्जित केलेल्या काही गणेशमूर्ती देखील संकलित केल्या. कार्यक्रम यशस्वितेसाठी एस. ए. पाटील, आर. एन. पाडवी, पी. जी. बिरारी, व्ही. एन. गावित, सी. पी. वळवी, एस. एस. गांगुर्डे, आर. एस. मुसगे, जे. जी. चौधरी, आर. एम. राऊत, एस. एन. सुकणे, आर. एन. वसावे यांनी परिश्रम घेतले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Covid 19 : कोविडची पहिली लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञावर चीनची मोठी कारवाई; भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केलं बरखास्त

Nashik Crime News : बेद टोळीचा शुटर बारक्याला पुण्यातून अटक! 3 महिन्यांपासून होता फरार; गुंडाविरोधी पथकाची कामगिरी

Nashik Traffic Problem: नियोजनाअभावी वाहतुकीचा बट्ट्याबोळ! उमेदवारी अर्जामुळे गर्दी; वाहतूक पोलिसांची तारांबळ

Modi Rally Pune: "एका अतृप्त आत्म्यानं महाराष्ट्रासह देशाला अस्थिरतेत लोटलं"; PM मोदींकडून नाव न घेता शरद पवारांवर घणाघाती टीका

Latest Marathi News Live Update : महायुती महाराष्ट्रातल्या विकासाचा अनुशेष भरुन काढेल- मोदी

SCROLL FOR NEXT