development-work
development-work 
उत्तर महाराष्ट्र

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या कुटुंबियांसाठी विंधनविहीर

सकाळवृत्तसेवा

सटाणा -  बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी आपल्या स्थानिक विकास निधीतून जोरण (ता.बागलाण) येथील आत्महत्याग्रस्त शेतकरी (कै.) नितीन बेडीस यांच्या कुटुंबियांना शेतीसाठी विंधनविहीरीसह वीजपंप बसवून दिला आहे. आमदार सौ.चव्हाण यांनी बेडीस कुटुंबियांना दिलेला शब्द पाळल्याने परिसरात समाधानाचे वातावरण पसरले आहे.

गेल्या ता.८ मार्च २०१७ रोजी तालुक्यातील जोरण येथील युवा शेतकरी नितीन बेडीस यांनी कर्जाला कंटाळून स्वतःच्या शेतातील विहिरीत गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घरातील कर्त्या व्यक्तीच्या आत्महत्येमुळे बेडीस कुटुंबीय उध्वस्त झाले होते. बागलाणच्या आमदार दीपिका चव्हाण यांनी बेडीस कुटुंबियांची तत्काळ भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. त्यावेळी आमदार सौ.चव्हाण यांनी बेडीस कुटूंबियांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन देऊन त्यांच्या शेतात विंधनविहीरीसह वीजपंप बसवून देणार असल्याचे वचन दिले होते. त्यानंतर आठ महिन्याच्या आत आमदार सौ.चव्हाण यांनी आपले वचन पूर्ण केले आहे.

आज जोरण येथे आमदार सौ.चव्हाण व माजी आमदार संजय चव्हाण यांच्या हस्ते नारळ वाढवून या विंधन विहिरीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी जोरणचे माजी उपसरपंच सुभाष सावकार, राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष किरण पाटील, देवमन बेडीस, शरद सावकार, रविंद्र बेडीस, नानु बेडीस, पप्पु ठाकुर, बापु बेडीस, संजय देवरे, अशोक पवार, दिपक बेडीस, बाळू बेडीस, राकेश सावकार, आण्णा बेडीस, जगन्नाथ बेडीस, बाबुराव बेडीस, गणेश बेडीस आदींसह ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Ocean : सगळ्यात वेगाने तापतोय हिंदी महासागर; ग्लोबल वॉर्मिंगचा अरबी समुद्राला बसणार मोठा फटका! भारताला किती धोका?

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

SCROLL FOR NEXT