gravel esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : डांबरीकरणाला ना मुहूर्त; खडीवरून घसरून अपघात

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : शहरातील नियमित मालमत्ता कर भरणाऱ्या देवपूरकरांच्या नरकयातना अद्यापही कमी झालेल्या नाहीत. एक समस्या निस्तरत नाही, तोच दुसरी समस्या उभी ठाकत आहे.

जलवाहिनी, भुयारी गटारींमुळे वाताहत झालेल्या रस्त्यांवरून दीड ते दोन वर्षे वाट काढल्यानंतर आता काही महिन्यांपूर्वीच देवपूरमधील प्रभाग क्रमांक दोनमध्ये विविध कॉलनीत खडीकरणाचे काम झाले. ( number of accidents increased due to bad condition of road dhule news )

रस्त्यांचे डांबरीकरण कशामुळे खोळंबले, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. काही नगरसेवकांनी आपापल्या परिसरात घराजवळील रस्ते पद्धतशीरपणे करून घेतले आहेत. खडीकरणापेक्षा आमचे कच्चे रस्त्येच बरे होते, असे रहिवासी म्हणत आहेत.

महापालिका प्रशासनासह सत्ताधाऱ्यांनी याप्रश्नी तातडीने तोडगा काढावा आणि लवकर डांबरीकरणाचा मुहूर्त शोधावा, अशी मागणी श्रीरंग कॉलनी, दोंदे कॉलनीसह इतर परिसरातून होत आहे.

मात्र, डांबरीकरणाला मुहूर्त नसल्याने रहिवाशांमध्ये नाराजीचा लाट आहे खडीवरून घसरून अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. यात अनेकजण जखमी झाले आहेत. त्यामुळे आमचे कच्चे रस्तेच बरे होते, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

डांबरीकरण आज ना उद्या होईल या प्रतीक्षेत चार महिने निघून झाले. पण डांबरीकरण होत नसल्याने रस्त्यावरील खडी पसरते आहे.

त्यावरून दुचाकी घसरून किंवा पायी असताना घसरून नागरिक जखमी होत असल्याचा सूर आहे. मुलांना मनमोकळेपणाने खेळताही येत नाही. खडीवरून वाहने गेल्याने टायर कमकुवत होत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lalbaghcha Raja Look: लालबागचा राजा २०२५ चा पहिला लूक समोर, प्रथम दर्शनातून दिसली पहिली झलक, पाहा व्हिडिओ

Rahul Gandhi: राहुल गांधींना किस केलं, सुरक्षा रक्षकानं तरुणाला पकडलं अन्...; बाईक रॅलीतील व्हिडिओ व्हायरल

AUS vs SA, ODI: दक्षिण आफ्रिकेचा वनडेतील सर्वात मोठा पराभव, तरी जिंकली ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका; पाहा काय झाले रेकॉर्ड

Latest Marathi News Updates : रस्त्याअभावी रखडली अंत्ययात्रा, पुरोगामी महाराष्ट्रात अंत्ययात्रेसाठी ट्रॅक्टरचा आधार

Nagpur Fraud;'बेटिंग ॲप’द्वारे किराणा व्यापाऱ्याची २६ लाखांची फसवणूक; सायबर पोलिसांकडून चौघांविरोधात गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT