Officials of tribal organizations while giving a statement at the office of the Superintendent of Police.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Riot News : सांगवीतील दंगलीची सीबीआय चौकशी करा; युवकांवरील गुन्हेही मागे घेण्याची मागणी

सकाळ वृत्तसेवा

Dhule Riot News : सांगवीतील दंगलीनंतर आदिवासी युवकांवर अन्याय होत असल्याचे सांगत विविध आदिवासी संघटनांतर्फे शुक्रवारी धुळे येथे मोर्चाचे आयोजन केले होते. मात्र, मोर्चाला परवानगी नाकारल्याने निवडक पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांच्या कार्यालयात जाऊन निवेदन दिले.

त्यात म्हटले आहे, की सांगवी येथे विश्व आदिवासी दिनानिमित्त आदिवासी क्रांतिकारकांच्या प्रतिमा असलेले बॅनर्स १० ऑगस्टला चारण समाजातील लोकांनी फाडले. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या आदिवासींना चारणांनी जातिवाचक शिवीगाळ करून बेदम मारहाण केली. त्यात तीन जण गंभीर जखमी झाले. (Officers demanded CBI inquiry in Sangvi riots dhule news)

सांगवी (ता. शिरपूर) येथील दंगल नियंत्रणासंदर्भात पोलिसांचे वर्तन आक्षेपार्ह असून, या दंगलीची ‘सीबीआय’तर्फे चौकशी करावी, शिरपूर उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे व सांगवी पोलिस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांची बदली करावी, आदिवासी युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या विविध आदिवासी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (ता. १८) जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देऊन केल्या.

  • त्यांच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहेत. या प्रकरणी संशयितांवर पोलिसांनी तातडीने गुन्हे दाखल करणे आवश्यक होते. मात्र, त्यांच्यावर दंगलीच्या दुसऱ्या दिवशी गुन्हे दाखल करण्यात आले. मुख्य संशयिताचे नाव ‘एफआयआर’मधून वगळले आहे. पोलिसांची ही कृती संशयास्पद असून, त्यांनी समयसूचकता न दाखविल्याने दंगल उसळून अनर्थ घडला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

दंगलीनंतर निर्दोष आदिवासी युवकांना लक्ष्य करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. त्यामुळे समाजात अस्वस्थता पसरली. पोलिस राजकीय दबावाखाली काम करीत असल्याची भावना वाढीस लागली आहे.

त्यामुळे पोलिस उपअधीक्षक हिरे व सहाय्यक निरीक्षक खलाणे यांची तातडीने बदली करावी, दंगलीची सीबीआय चौकशी करावी, खरे गुन्हेगार हुडकून काढावेत आणि युवकांवरील गुन्हे मागे घ्यावेत, अशा मागण्या भिल समाज विकास मंचाचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे, जिल्हा सचिव अशोक सोनवणे, बिरसा फायटर्सचे नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा, जिल्हाध्यक्ष वसंत पावरा, तालुकाध्यक्ष ईश्वर मोरे यांनी केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT