A loose bull caught on camera attacking Digambar Sonar in Ganpati Galli. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : तळोद्यात वळूच्या हल्ल्यात एक जखमी; बंदोबस्ताची नागरिकांची मागणी

शहरात गणपती व खानदेशी गल्ली परिसरात एका मोकाट वळूने तीन नागरिकांवर जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी (ता. २२) घडली.

सकाळ वृत्तसेवा

तळोदा : शहरात गणपती व खानदेशी गल्ली परिसरात एका मोकाट वळूने तीन नागरिकांवर जीवघेणा हल्ला करून जखमी केल्याची घटना सोमवारी (ता. २२) घडली. मोकाट वळूकडून अचानक होत असलेल्या या हल्ल्यांनी नागरिक जीव मुठीत धरून राहत आहेत.

मात्र मोकाट जनावरांचे मालक व पालिका प्रशासनाला कोणतेही सोयरसुतक नसल्याचे नागरिकांकडून बोलले जात आहे. शहरात गल्लोगल्ली व बाजारपेठेत बिनधास्त वावरणाऱ्या मोकाट जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. (One injured in bull attack in Taloda Citizens demand for settlement Nandurbar News)

शहरात मोकाट जनावरांचा हैदोस ही नवीन बाब नाही. दररोज मोकाट जनावरांमुळे शहरात रहदारीला अडथळा निर्माण होत असताना आता मोकाट जनावरांनी नागरिकांवर हल्ले करायला सुरवात केली आहे.

शहरातील गणपती गल्लीत सोमवारी दुपारी दिगंबर सोनार गल्लीतून चालत जात असताना एका घराच्या समोर उभ्या असलेल्या वळूने अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात ते अक्षरशः हवेत उंचावर फेकले गेले. त्यामुळे त्यांना जबर मुकामार बसला.

दुसरीकडे खानदेशी गल्लीत धजा सजनकार या ज्येष्ठ नागरिकालादेखील त्याच वळूने उचलून फेकण्याचा प्रकार केला. मोकाट जनावरांच्या हल्ल्यात मुकेश कर्णकार, दिलीप कर्णकार यांनादेखील जखमी व्हावे लागले.

तीन ते चार लहान बालके वळूच्या हल्ल्यात बालबाल बचावली. पालिका प्रशासन ढिम्मपणे कोणतीही कारवाई करीत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

त्यात शहरात गल्लोगल्ली मोकाट जनावरे फिरत असल्याने नागरिकांना जीव मुठीत धरून राहावे लागत आहे. त्यामुळे पालिका प्रशासनाने मोकाट जनावरांचा तत्काळ बंदोबस्त करावा व भीतीचे वातावरण दूर करावे, अशी मागणी शहरात होत आहे.

पालिका प्रशासनाबाबत नाराजी

शहरात स्मारक चौक ते मेन रोड तसेच बसस्थानक परिसर नेहमी मोकाट जनावरांनी गजबजलेला असतो. शहरात मोकाट जनावरांना बंदिस्त करण्यासाठी कोंडवाडा नाही.

त्यातच पालिका प्रशासन केवळ मोकाट जनावरांच्या मालकांना नोटिसा देण्यापलीकडे कोणतीही ठोस कारवाई करीत नसल्याचे नागिरकांचे म्हणणे आहे. मोकाट जनावरांचे मालक केवळ जनावरांपासून फायदा घेऊन त्यांची पालनपोषणाची जबाबदारी घेत नसल्याची परिस्थिती आहे.

त्यामुळे नागरिकांनी करावे तरी काय असा, प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यात आता हल्ले होत असल्याने पालिका प्रशासनाबाबत नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT