Talathi Bharti  esakal
उत्तर महाराष्ट्र

Talathi Bharti News: तलाठी भरतीतील उमेदवारांसाठी व्यवस्था; उत्तरतालिका ऑनलाइन पाहण्याची सुविधा उपलब्ध

सकाळ वृत्तसेवा

Talathi Bharti News: जिल्ह्यातील ज्या उमेदवारांनी तलाठी भरती परीक्षा दिली आहे, त्यांना आठ ऑक्टोबरपर्यंत उत्तरपत्रिका पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

उत्तरपत्रिका पाहण्यासाठी संबंधित उमेदवादारांच्या ऑनलाइन लॉगइनमध्ये सोय केली आहे. तसेच उमेदवारांना काही हरकत असल्यास ती परीक्षा घेणाऱ्या कंपनीकडे नोंदविता देखील येणार आहे. (Online view of answer sheet facility available for students in talathi bharti dhule news)

तलाठी भरती परीक्षा पार पडल्यानंतर परीक्षा दिलेल्या उमेदवारांना आता उत्तरतालिका पाहण्याची सोय उपलब्ध केली आहे. उत्तरतालिका पाहिल्यानंतर उमेदवारांना काही शंका, आक्षेप, हरकत असल्यास परीक्षा घेतलेल्या टीसीएस कंपनीकडून लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामध्ये एका हरकतीला शंभर रुपये शुल्क आकारले जाईल.

आक्षेप योग्य असल्यास ही रक्कम संबंधित उमेदवाराला परत देखील केली जाणार आहे. मात्र, आक्षेप अयोग्य असल्यास शंभर रुपये शुल्क परत केले जाणार नाही. तसेच उमेदवारांकडून नोंदविण्यात आलेले आक्षेप टीसीएस कंपनीच्या समितीकडे जातील.

या समितीकडून प्राप्त आक्षेपांचे निरसन केले जाणार असल्याची माहिती अपर जमाबंदी आयुक्त आणि तलाठी भरती परीक्षेचे समन्वयक आनंद रायते यांनी दिली.

ही प्रक्रिया झाल्यानंतर निकाल संकेतस्थळावर प्रसिद्ध केला जाईल. संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणारा निकाल अंतिम असेल. त्याबाबत कोणतेही आपेक्ष, हरकती स्वीकारल्या जाणार नाहीत. तलाठी पदाची परीक्षा १९ दिवस तीन सत्रांत झाली.

जाहीर प्रकटनातील अटीप्रमाणे तसेच शासन निर्णयातील तरतुदीनुसार पात्र आणि अपात्र गुणांनुसार उमेदवारांना मिळालेल्या गुणांसह जिल्हानिहाय पात्रता यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध केली जाणार आहे. ही यादी संबंधित जिल्हाधिकारी यांच्याकडे सुपूर्त करण्यात येईल.

याबाबतच्या सर्व नोटीस भूमी अभिलेख विभागाकडून संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur Voter List Revision : कोल्हापूर जिल्ह्यातील साडेचार लाख मतदार वगळणार; 'एसआयआर'चे 99.91 टक्के काम पूर्ण, पाहा विधानसभा मतदारसंघनिहाय चित्र

World Record Tiranga Rally: डोंबिवलीत तिरंग्याचा विश्वविक्रमी डौल, ३५ हजार चौरस फुटांच्या ध्वजासह भव्य रॅली

Palkhed Dam Tricolour Lighting: तिरंग्याच्या रंगात न्हाले धरणः स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून मनमोहक तिरंगी विद्युत रोषणाई

Marathi News Live Updates : भोर तालुक्यातील खड्ड्यांमध्ये भात लावून विद्यार्थ्यांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

Kamalakar Chaskar Police Medal: चास गावच्या सुपूत्राला केंद्र सरकारच्या गृह मंत्रालयाकडून उल्लेखनीय कामगिरीबद्दल 15 ऑगस्ट रोजी अति उत्कृष्ट सेवा पदक जाहीर

SCROLL FOR NEXT