only 11 Women become candidate in Nashik district  for Vidhan Sabha 2019
only 11 Women become candidate in Nashik district for Vidhan Sabha 2019 
उत्तर महाराष्ट्र

Vidhan Sabha 2019 : नाशिक जिल्ह्यात उमेदवारीसाठी महिलांना नापसंती; फक्त 11 महिला रिंगणात

खंडू मोरे

Vidhan Sabha 2019 : खामखेडा (नाशिक) : महिलांना राजकारणात समान वाटा देण्याचे अधिनियम राज्यघटनेने पारित केले. महिलांना पन्नास टक्के प्राधान्याचे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये त्याचे प्रतिबिंब पहावयास मिळाले. मात्र, लोकसभा व त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी देतांना सर्वच राजकीय पक्षांनी महिलांना नापसंती दर्शवली आहे. २०१४ च्या निवडणुकीत १५ महिला उमेदवार रिंगणात होत्या. तुलनेत यंदा महिला उमेदवारांची संख्या घटली आहे. यंदा ११ महिला उमेदवार निवडणूकीत नशीब आजमावित आहेत. हे प्रमाण अवघे सात टक्के इतके आहे. 

२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत १५ महिला उमेदवार रिंगणात होत्या. त्यापैकी बागलाणमधून दीपिका चव्हाण, नाशिक मध्यमधून प्रा.देवयानी फरांदे, नाशिक पश्चिममधून सीमा हिरे आणि इगतपुरीतून निर्मला गावित यांनी विजयश्री प्राप्त केली होती. चालू वर्षी प्रमुख राजकीय पक्षांनी जिल्ह्यात महिलांना प्राधान्याने उमेदवारी देण्याचे टाळलेले दिसते. काँग्रेस, शिवसेना व बहुजन विकास आघाडीने पक्षाने एक, राष्ट्रवादी पक्ष्याने दोन,भाजपने तीन व अपक्ष तीन तर मनसेने मात्र एकाही महिलेला तिकीट दिलेले नाही.
      

यंदा जिल्ह्यातील बागलाणमधून राष्ट्रवादीकडून दीपिका चव्हाण अपक्ष अंजनाबाई मोरे, देवळालीतून राष्ट्रवादीच्या सरोज अहिरे, नाशिक मध्यमधून भाजपच्या देवयानी फरांदे आणि काँग्रेस आघाडीच्या डॉ. हेमलता पाटील, नाशिकपूर्वमधून अपक्ष भारती मोगल, नाशिक पश्चिममधून भाजपच्या सीमा हिरे व बहुजन विकास आघाडीच्या मनीषा साळुंखे, मालेगावमध्यमधून भाजपच्या दीपाली वारुळे तर इगतपुरीत शिवसेनेकडून निर्मला गावित,अपक्ष शैला झोले या उमेदवारी करीत आहेत.

निफाड, दिंडोरी, कळवण-सुरगाणा, चांदवड, मालेगाव बाह्य,येवला आणि नांदगाव या मतदारसंघांत एकही महिला उमेदवार नाही. मात्र, मागील निवडणुकीत निवडून गेलेल्या चारही महिला आमदार यंदा पुनश्च नशीब आजमावत आहेत.
        
राज्यातील राजकीय पक्ष्यांकडून महिला उमेदवारांना उमेदवारी मिळेल असे चित्र होते. मात्र, जिल्ह्यातील सर्वच मतदार संघातील कीट मिळविण्यात पुरुष उमेदवारांचे वर्चस्व दिसून आले. सर्वच पक्षांमध्ये प्रबळ, आपले प्रभुत्त्व, वेगळी ओळख असलेल्या महिला कार्यकर्त्या पदाधिकारी आहेत. राजकारणात महिलाही पुरुषांच्या बरोबरीने सहभाग नोंदवित आलेल्या आहेत. काही महिलांनी तर सत्तेत महत्त्वाची खाती सांभाळत आपल्या कार्यक्षमतेची चुणूक दाखवून दिलेली आहे. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत ५० टक्के आरक्षण असले तरी विधानसभेत मात्र, प्रमुख पक्षांनी महिलांच्या उमेदवारीकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. 


जिल्ह्यातील प्रतिनिधित्व केलेल्या महिला उमेदवार
 रुक्मिणी वाजे सिन्नर, आयेशा हकीम मालेगाव, दाभाडीतून पुष्पाताई हिरे यांनी चार वेळा प्रतिनिधित्व केले आहे. मंदाकिनी कदम निफाड, डॉ.शोभा बच्छाव नाशिक, दीपिका चव्हाण बागलाण, देवयानी फरांदे व सीमा हिरे नाशिक,निर्मला गावित इगतपुरी.    

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, KKR vs SRH: कोण गाठणार फायनल? कोलकता-हैदराबादमध्ये रंगणार ‘क्वॉलिफायर वन’चा थरार

Pune Porsche Car Accident : ''जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून मी घटनास्थळावर पोहोचलो अन्...'', आमदार टिंगरेंनी अपघाताबद्दल आरोपावर स्पष्टच सांगितलं

Beed Bogus Voting : ''बोगस वोटिंग प्रकरणात कठोर कारवाई करा'' बीडच्या प्रकरणात शरद पवारांनी घातलं लक्ष

Nashik Crime News: आयुक्तालय हद्दीत आचारसंहिता भंगचे 7 गुन्हे! विविध पोलीस ठाण्यांमध्ये अदखलपात्र गुन्हे दाखल

Julian Assange : 'विकीलिक्स'चे संस्थापक असांज यांना लंडनमधील कोर्टाचा मोठा दिलासा! प्रत्यार्पणाला देता येणार आव्हान

SCROLL FOR NEXT