Office bearers and members of Birsa Fighters with a statement.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : शिक्षणशास्त्र महाविद्यालयात मूळ कागदपत्रांची अडवणूक; विद्यार्थ्यांचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शिक्षणशास्त्र महाविद्यालयात असंख्य विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रे संबंधित महाविद्यालयांनी अडवून ठेवली आहेत. (original documents of many students have been withheld by respective colleges in shikshanshastra college nandurbar news)

अनेक विद्यार्थ्यांची बीएड पदविका पूर्ण होऊन दोन वर्षे उलटले असून, मूळ कागदपत्रांअभावी त्यांचे नुकसान होत आहे. त्यामुळे अडविलेली मूळ कागदपत्रे त्वरित मिळावीत यासाठी बिरसा फायटर्सतर्फे आदिवासी विकासमंत्री, जिल्हाधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी, नंदुरबार यांना निवेदन देण्यात आले आहे.

निवेदनाचा आशय असा ः विद्यार्थी व पालकांच्या आलेल्या तक्रारीनुसार जिल्ह्यातील शिक्षणाशास्त्र महाविद्यालयात ज्या विद्यार्थ्यांची पूर्ण शिष्यवृत्ती, वाढीव फी जमा झाली नाही अशा विद्यार्थ्यांची कागदपत्रे महाविद्यालय स्तरावरून अडवणूक करण्यात आली आहे. पहिले शैक्षणिक २०१९-२० व दुसरे २०२०-२१ असे शिक्षणशास्त्र पदविका पूर्ण होऊन दोन वर्षे झाली.

अद्यापही पदविकाधारकांना मूळ कागदपत्रे न मिळाल्यामुळे त्यांना सीईटी, टीईटी, टेट, मुलाखती देण्यासाठी तसेच ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी व इतर जॉबसाठी गुणपत्रक, जात प्रमाणपत्र, जातपडताळणी प्रमाणपत्र, दाखला ही मूळ कागदपत्रे अपलोड करावी लागतात. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाकडून शिक्षणशास्त्र महाविद्यालयाने जेवढी शिष्यवृत्तीची मागणी केली होती; तेवढी आम्ही दिली आहे, असे सांगितले जाते आणि महाविद्यालयात कागदपत्रे मागणीसाठी गेल्यास विद्यार्थ्यांना असभ्य भाषेत बोलून तेथून हाकलून लावले जाते. अशा दोन्ही बाजूनी गरीब विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

परिणामी मूळ कागदपत्रांअभावी आदिवासी विद्यार्थ्यांना नोकरीला व इतर ऑनलाइन फॉर्म भरण्यासाठी मुकावे लागत आहे. या दोन्ही यंत्रणाच्या तु-तु, मैं-मैंमुळे विद्यार्थ्यांना मानसिक त्रासही होत आहे. त्यामुळे गांभीर्याने विचार करून, पदविकाधारकांची मूळ कागदपत्रे त्वरित देण्यात यावीत, अन्यथा पदविकाधारकांसह बिरसा फायटर्स तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

निवेदनावर राज्य महासचिव राजेंद्र पाडवी, जिल्हाध्यक्ष भरत पावरा, अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी, नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी, जिल्हा कोशाध्यक्ष हिरामण खर्डे, रोझवा पुनर्वसन शाखाध्यक्ष बारक्या पावरा, नवापूर कार्याध्यक्ष शमवेल गावित यांच्या सह्या आहेत.

"माझे बी.एड. २०२१ मध्ये पूर्ण झाले आहे; परंतु कागदपत्रे महाविद्यालयाने दिलेली नाहीत. कागदपत्रे मागायला गेल्यावर पूर्ण फी जमा करा. तुमची स्कॉलरशिप आलेली नाही, असे बोलून परत पाठवतात. मूळ कागदपत्रांअभावी नुकसान होत आहे." -रिंकू वळवी, बी.एड. विद्यार्थिनी

"बी.एड. पूर्ण होऊन दोन वर्षांनंतरही कागदपत्रे मिळत नाहीत हे अतिशय दुर्दैव आहे. संबंधित दोन्ही यंत्रणांच्या तु -तु, मैं-मैंमुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे, याला जबाबदार कोण? तात्काळ मार्ग काढा, अन्यथा लवकरच तीव्र आंदोलन करू." -राजेंद्र पाडवी राज्य महासचिव, बिरसा फायटर्स

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

Mughal Treasury Found: बापरे! मुगल काळातील खजिना सापडला, मनरेगा कामगारांना उत्खननादरम्यान असं काही सापडलं की प्रशासनही हादरलं

Success Story: १४ तास अभ्यास, परीक्षेच्या २० दिवस आधी घरातील सदस्य गमावला, अडचणीवर मात करून तरुण सीए बनला

SCROLL FOR NEXT