Aurangabad Submit fake doctors information Taluka Health Officer to Health Center sakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पंचायत समिती सदस्यांचा सवाल; प्राथमिक आरोग्य केंद्र की रेफर केंद्र?

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : आदिवासीबहुल साक्री तालुक्यात लोकांच्या आरोग्यसेवेसाठी १५ प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ८० हून अधिक उपकेंद्रे असताना या केंद्रांमधून आरोग्याची सेवा न मिळता केवळ अन्य रुग्णालयांमध्ये रेफर करण्यात येते.

अनेक वेळा तर रुग्णांना भीती दाखवत काही विशिष्ट खासगी रुग्णालयांमध्ये रेफर केले जाते. यातून काही आर्थिक देवाणघेवाण होते का, असा संतप्त सवाल पंचायत समिती सदस्यांनी आरोग्य विभागाच्या आढावा बैठकीत केला.(Panchayat Samiti members Question Primary Health Centre care dhule news)

येथील तालुका आरोग्य विभागाची आढावा बैठक पंचायत समिती सभापती दालनात पार पडली. सभापती शांताराम कुवर, उपसभापती माधुरी देसले, सदस्य ॲड. नरेंद्र मराठे, महावीर जैन, रोहिदास महाले, भिकचंद टाटिया, सदस्य प्रतिनिधी गणेश गावित, तालुका आरोग्याधिकारी डॉ. हितेंद्र गायकवाड आदींसह अधिकारी उपस्थित होते.

बैठकीला अनेक आरोग्याधिकारी अनुपस्थित राहत त्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहिल्याने सुरवातीलाच अनेक पंचायत समिती सदस्यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच अनुपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना नोटिसा बजावण्याचीदेखील त्यांनी सूचना केली.

बैठकीत प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्रनिहाय आढावा घेत असताना उपस्थित काही वैद्यकीय अधिकारी तसेच त्यांच्या प्रतिनिधींना योग्य माहिती देता येत नव्हती. यातून आरोग्याधिकारी, कर्मचारी त्या आरोग्य केंद्रांवर उपस्थितच राहत नाहीत, अनेक जण मुख्यालयी राहत नाहीत यामुळे त्यांनाच माहिती नाही.

या सर्व बेशिस्त कारभाराला तालुका आरोग्याधिकारी व अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष जबाबदार असल्याचा आरोप सदस्यांनी केला. तालुका आरोग्याधिकारी या उपकेंद्रांना नियमित भेटी देतात का, देत असतील तरीदेखील ही परिस्थिती का, असादेखील सवाल करत सदस्यांनी तालुका आरोग्याधिकाऱ्यांना बैठकीत जाब विचारला.

बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट...

आरोग्य विभागात डॉक्टर मिळत नसले तरी वैद्यकीय अधिकारीपद रिक्त असेल तरी ग्रामीण भागात मात्र बोगस डॉक्टर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. काही खासगी रुग्णालयांमध्ये मदतनीस म्हणून काम करणारेदेखील ग्रामीण भागात रुग्ण तपासून त्यांना औषधे देत असल्याचा आरोप बैठकीत सदस्यांनी केला.

अनेक प्राथमिक आरोग्य केंद्रांमधून रुग्ण थेट काही विशिष्ट खासगी रुग्णालयात जात असल्याचे वारंवार दिसून येते आहे. या सर्व प्रकारात काही आर्थिक हितसंबंध गुंतले आहेत का, याचादेखील शोध घेत कारवाई करण्यात यावी, अशा सूचना सदस्यांनी तालुका आरोग्याधिकाऱ्यांना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'अरे ९० वर आहे, आऊट होईल...'! खेळाडूने स्लेजिंग केली, Vaibhav Suryavanshi चा 'Cute' रिप्लाय; मोडला गिल, AB चा विक्रम...

Pune News : दौंडमध्ये SRPF च्या ७१ व्या दीक्षांत संचलनात ३१६ नवप्रविष्ठांना कर्तव्यशपथ; आधुनिक युद्धतंत्राची तयारी सुरू!

Latest Marathi News Live Update : शनैश्वर देवस्थानचा कारभार विश्वस्तांनीच पहावा, उच्च न्यायालयाचा आदेश

Google Search : रात्रीच्या वेळी मुली गुगलवर सर्वांत जास्त काय सर्च करतात? 2025 च्या धक्कादायक डेटामुळे जग हादरलं

Manchar News : मंचरमध्ये हुतात्मा बाबू गेनू प्राण ज्योतीचे जल्लोषात स्वागत; घोषणांनी दुमदुमला छत्रपती शिवाजी महाराज चौक!

SCROLL FOR NEXT