sugar factory
sugar factory sakal
उत्तर महाराष्ट्र

पांझरा कान कारखान्यातून पुढील वर्षी गाळप शक्य : उद्योजक पवन मोरे

सकाळ वृत्तसेवा

साक्री (जि. धुळे) : बंद असलेला पांझरा कान सहकारी साखर कारखाना नाशिक येथील स्पर्श शुगर इंडस्ट्रीजने पुढील २५ वर्षांसाठी भाडेकराराने चालविण्यास घेतला असून, शक्य झाल्यास पुढील वर्षापासूनच गाळप हंगामास सुरवात होणार असल्याची माहिती उद्योजक पवन मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नाशिक येथील स्पर्श शुगर इंडस्ट्रीजने पांझरा कान कारखाना २५ वर्षासाठी भाडेकराराने घेतल्यानंतर या संदर्भात मंगळवारी (ता.२१) उद्योजक पवन मोरे यांनी विश्रामगृह येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पवन मोरे म्हणाले, बँकेशी भाडे करार झाल्यानंतर दस्त नोंदणीची प्रक्रिया देखील पूर्ण झाली असून, शिखर बँकेचे प्राधिकृत अधिकारी संजय शिंदे यांनी आपल्याकडे कारखान्याचा ताबा दिला आहे. सुरवातीला दोन वर्षे ५२ लाख रुपये वार्षिक भाडे राहणार आहे. त्यानंतर पुढील दोन वर्षांसाठी एक कोटी तर त्यापुढे दोन कोटी रुपये वार्षिक भाडे असणार आहे.

या ठिकाणी असणारी पूर्वीची मशिनरी ही फारशी उपयोगात येणार नसल्याने संपूर्णपणे नवीन मशिनरी आणून कारखाना सुरू करणार आहोत. यातून शक्य झाल्यास पुढील वर्षीच ऊस गाळपास सुरवात करण्याचा प्रयत्न राहणार आहेत. तसेच या ठिकाणी असणाऱ्या संपूर्ण २८७ एकर जागेचा ताबा मिळाला आहे. या जागेवर शिखर बँकेने शेतीपूरक अन्य व्यवसाय करण्यास देखील परवानगी दिली आहे. यामुळे या ठिकाणी आणखी अन्य शेतीपूरक उद्योग सुरू करून अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहणार असल्याची माहिती यावेळी उद्योजक पवन मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेत धनंजय अहिरराव, पंचायत समिती उपसभापती ॲड. नरेंद्र मराठे, मनसेचे संघटक धीरज देसले आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jaish e Mohammed: जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट, निकाल देताना दिला रशियन लेखकाचा दाखला

Share Market Opening: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियाचे शेअर्स वधारले, नेस्लेचा शेअर घसरला

Sana Shinde: "36 अंश सेल्सिअस तापमान, 4 तास घामाने भिजल्यानंतर..."; मतदानाचा हक्क बजावल्यानंतर सना शिंदेची पोस्ट

Justice Chitta Ranjan Das: आज मला खरं सांगायला हवं... निवृत्तीच्या दिवशी RSS बद्दल न्यायमूर्ती असे का म्हणाले?

Star Sports Hits Back Rohit Sharma : 'हिटमॅन' रोहित शर्माच्या आरोपांवर स्टार स्पोर्ट्सने केला पलटवार; म्हणाले...

SCROLL FOR NEXT