accidant
accidant 
उत्तर महाराष्ट्र

एक यात्रा आटोपली... दुसऱ्या यात्रेला निघाले अन्‌ घडले भिषण ! 

सकाळ वृत्तसेवा

पारोळा ः जळगाव जिल्ह्यातील विविध गावांतील बाजार, यात्रांमध्ये कटलरी वस्तूचे विक्रीचा व्यवसाय करणाऱ्या दोन जणांवर आज काळाचा घाला आला. माहिजी येथील यात्रा आटपून धुळे येथील राम बोरीस यात्रेत दुकान लावण्यासाठी जातांना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील पारोळा जवळील तुराटखेडे गावालगत मॅंटेडोर व टॅंकरचा दुपारी भिषण अपघात झाला. या अपघात दोघांचा मृत्यू तर दोन जण गंभीर जखमी झाले. 

जळगाव येथील मासुमवाडी येथील रहीवाशी शेख इक्‍बाल शेख तायर (वय 28) शेख आलताफ शेख वहब (वय 32) हे कटलरी व्यवसाय करित असल्याने त्यांचे सोबत चालक वसिम पटेल (वय 30 ) हे तीन जण आपल्या मॅटेडोर गाडी (क्र एम. एच. 15 इव्ही 2381) ने माहीजी येथुन यात्रा आटोपुन धुळे येथील राम बोरीस यात्रेत दुकान लावणेकामी जात असतांना राष्ट्रीय महामार्ग क्र.6 वर धुळे कडुन येणारा टॅंकर (क्र. एम. एच. 48 जे 0522 वरिल चालक महेंद्र यादव या दोघांच्या वाहनात धडक झाल्याने या अपघातात शेख इक्‍बाल,शेख अल्ताफ या दोघांचा जागीच मृत्यु झाला. तर टॅंकर चालक महेंद्र यादव व पिकअप चालक वसिम पटेल हे दोघ जखमी झाले आहेत. सदर घटनेची माहीती कळताच रुगणवाहीका चालक ईश्वर ठाकुर, मुकेश ठाकुर यांचेसह पोलिसांनी धाव घेतली. यावेळी परिसरातील ग्रामस्थांनी मदत करित अपघातातुन मयतांना बाहेर काढले. यावेळी कुटीर रुग्णालयात जखमी महेंद्र यादव यावर डॉ. योगेश साळुंखे व डॉ. प्रशांत सोनवणे यांनी उपचार केलेत. तर वसिम शेख यावर एरंडोल येथे रुग्णालयात उपचार सुरु आहेत. 

गाडीचा चक्काचुर 
मॅटोडोर व टॅंकरचा अपघात अतिशय भिषण होता. दोघा वाहनांचे मोठे नुकसान झाले होते. यात मॅटेडोरचे तर पुढील भाग चक्काचुर झाला होता. दोघा गाडींचा अवस्था पाहूनच अपघाताची भिषणता समोर येत होती

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pension Department: पेन्शनधारकांना सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

Latest Marathi News Live Update: सलमान खान गोळीबार प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल; सीबीआय तपासाची केली मागणी

Indian Navy : अरबी समुद्रात पुन्हा भारतीय नौदलाची हवा, 20 पाकिस्तानींसाठी ठरले देवदूत

Bhushan Pradhan: 'या' अभिनेत्रीच्या प्रेमात पडलाय भूषण प्रधान? व्हिडीओ पाहून नेटकरी म्हणाले, "लवकर लग्न करा!"

Virat Kohli : 'खूप फसवणूक झाली मात्र आता...' विराट कसा झाला 634 कोटी रूपयाचा मालक?

SCROLL FOR NEXT