Secondary Education Officer Mohan Desale and officials of teacher unions while distributing the order of incremental subsidy to partially subsidized schools. esaka
उत्तर महाराष्ट्र

Dhule News: अंशतः अनुदानित शाळांना टप्पावाढ! माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांचे सकारात्मक प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

धुळे : जिल्ह्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव टप्पा अनुदानाचे आदेश मिळण्यासाठी अनेक प्रकारच्या अडचणी येत होत्या. अखेर अंशतः अनुदानित शाळा व वर्गतुकड्यांचा वाढीव टप्पा अनुदानाचा प्रश्न माध्यमिक शिक्षणाधिकारी मोहन देसले यांच्या सकारात्मक प्रयत्नामुळे सुटला.

त्यात २०२२-२३ ची संचमान्यता, शालेय विद्यार्थी आधार वैध, अवैध माहिती, नवीन शाळांचे शालार्थ मान्यतेसह अनेक प्रश्न होते. त्यामुळे अनेक शाळांना वाढीव टप्पा अनुदानापासून वंचित राहावे लागते की काय, असा प्रश्न निर्माण झाला होता. (Partially aided schools step up Positive efforts of Secondary Education Officer Mohan Desle Dhule News)

शासनाने वाढीव टप्पा अनुदान वितरण करण्यासाठी फेब्रुवारीच्या महिन्यात शासन निर्णय काढला होता; परंतु त्या शासन निर्णयात जाचक अटी व शर्ती टाकण्यात आल्या होत्या. त्या अटी व शर्ती रद्द करून सरसकट अनुदान देण्यात यावे यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी सभागृहात सरसकट अनुदान वितरण करावे यासाठी प्रश्न उपस्थित केला होता. त्यामुळे विद्यमान शिक्षणमंत्र्यांनी ही सकारात्मक भूमिका घेत त्यातून मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते.

अनुदान वितरणाची ३१ मार्च ही शेवटची तारीख अशा परिस्थितीत धुळे जिल्ह्यातील शाळांना वाढीव टप्पा अनुदानापासून वंचित राहावे लागणार की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. अशा परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी धुळे जिल्हा स्वाभिमानी शिक्षक संघटनेचे जयपाल देशमुख, सी. डी. राजपूत, शेखर बागूल, राम पाटील, चेतन भामरे, ओम सूर्यवंशी, प्रकाश मराठे, शिक्षकभारतीचे अशपाक खाटीक, कैलास अमृतकर, मुख्याध्यापक संघाचे आर. व्ही. पाटील, संजय पवार, उदय तोरवणे, देवानंद ठाकूर आदी पदाधिकाऱ्यांनी धुळ्यातील शिवाजी हायस्कूलमध्ये शिक्षणाधिकाऱ्यांची भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. शिक्षणाधिकाऱ्यांनी तपासणीच्या कामाला गती देत टप्पा अनुदानाचे पत्र देताना काही अडचणी आल्या. त्यातून मार्ग काढत गेले.

हेही वाचा : शॉर्ट सेलर्स म्हणजे नक्की कोण?

आभार व्यक्त

वरिष्ठ पातळीवर आमदार कपिल पाटील व आमदार सत्यजित तांबे यांनीही सहकार्य केल्यामुळे धुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा या वाढीव टप्पा अनुदानास पात्र ठरल्या आहेत. आता पात्र शाळांना लाभ मिळणार आहे.

अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांनी सहकार्य केल्याबद्दल धुळे माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी मोहन देसले, उपशिक्षण अधिकारी सुधाकर बागूल, वेतन अधीक्षक मीनाक्षी गिरी आदींचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'पोलिसात न्या, तिथं बघतोच तुम्हाला, माझा बाप...' मनसे नेत्याच्या लेकाची इन्फ्लुएन्सरला शिवीगाळ, अर्धनग्नावस्थेतला VIDEO VIRAL

Pune News: शिक्षकांचे आंदोलन सुरू, पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही,शाळा ८, ९ जुलैला बंद राहणार नाहीत, शिक्षण विभाग

Sangli Muharram: 'हिंदू-मुस्लिम ऐक्याची दीडशे वर्षांची परंपरा'; गगनचुंबी ताबुतांच्या कडेगावात गळाभेटी

Viral Video: अप्पाचा विषय लय हार्डय ! जीम ट्रेनर समोर आजोबांनी मारले जोर पण टोपी पडली नाही... पाहा अनोख्या कौशल्याचा व्हिडिओ

'ही प्राडाची नाही... ओरिजनल कोल्हापुरी आहे'; Prada ला टोला लगावत अभिनेत्री करिना कपूर 'कोल्हापुरी चप्पल'बाबत काय म्हणाली?

SCROLL FOR NEXT