people demand to fast trains to stop at Sindkheda railway station dhule news  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : शिंदखेडा रेल्वेस्थानकावर जलद गाड्यांना थांबा मिळेल का? रेल्वे राज्यमंत्री दानवे यांच्याकडून अपेक्षा

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : जिल्ह्यातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या शिंदखेडा शहरातील रेल्वेस्थानकावर जलदगाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी अनेक वर्षांपासून सातत्याने सुरू आहे. या संदर्भात संबंधित रेल्वे अधिकारी तसेच रेल्वेमंत्र्यांना वारंवार निवेदने देण्यात आली. वेळप्रसंगी आंदोलनेही करण्यात आली. आश्वासनेही मिळाली पण पदरी निराशाच आली.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे शुक्रवारी (ता. १५) पाणीपुरवठा योजनेच्या लोकार्पणासाठी शिंदखेड्यात येत आहेत. (people demand to fast trains to stop at Sindkheda railway station dhule news)

या वेळी ते जलद गाड्यांना शिंदखेडा स्थानकात थांबा व नवीन शिंदखेडा-पुणे रेल्वेसेवा सुरू करण्याची घोषणा करतील, अशी अपेक्षा शिंदखेडा शहरवासीयांना लागली आहे.

शिंदखेडा शहर तालुक्याचे मध्यवर्ती रेल्वेस्थानक असून, तेथून शिरपूर, धुळे, सोनगीर, नरडणा, चिमठाणे गावातील प्रवासी रेल्वेने प्रवास करत असतात. पुणे-शिंदखेडा-पुणे प्रवासी रेल्वे व्हाया दोंडाईचा-नंदुरबार-नवापूर व्हाया वसई रोड- कल्याण-कर्जत-लोणावळा-पुणे सुरू करावी, कारण पुणे हे शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असून, जिल्ह्यातून शैक्षणिक कामासाठी पुण्याला जाण्या-येण्यासाठी सोयीचे होईल आणि प्रवाशांचा वेळ आणि पैशा वाचेल व रेल्वेच्या उत्पन्नात भर पडेल. अमरावती-सुरत एक्स्प्रेस गाडी नियमित सुरू करावी.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

नंदुरबार पॅसेंजर गाडी सुरत स्टेशनपर्यंत पूर्ववत सुरू करावी यासह शिंदखेडा रेल्वेस्थानकावर पुरी-अहमदाबाद, प्रेरणा एक्स्प्रेस, भागलपूर-सुरत एक्स्प्रेस, बरोनी-अहमदाबाद एक्स्प्रेस, अहमदाबाद साप्ताहिक एक्स्प्रेस, हिंसार एक्स्प्रेस, बांद्रा-पाटणा एक्स्प्रेस, उधना-बनारस एक्स्प्रेस या सर्व जलद रेल्वेगाड्यांना थांबा मिळावा, अशी मागणी आहे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

TVK West Bengal Expansion : तमिळनाडूनंतर आता 'या' राज्यातही विजय यांच्या 'टीव्हीके'ची एन्ट्री? पक्ष कार्यालय उद्घाटनानंतर राजकीय चर्चांना उधाण

Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Latest Marathi News Live Update : पुण्यात स्वाईन फ्लूचा वाढता धोका; दोन महिन्यांत ६२६ रुग्णांची नोंद

Multibagger Stock: 1 लाखाचे झाले 8.50 लाख! शेअर बाजार लाल, पण या शेअरने केले मालामाल; 9 महिन्यांत तब्बल 700% रिटर्न

SCROLL FOR NEXT