Tehsildar Dnyaneshwar Sapkale  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Crime News : वाळूमाफियांची ‘दबंगगिरी’; तहसीलदारसह चालकाला धक्काबुक्की

सकाळ वृत्तसेवा

Dhule Crime News : पाष्टे (ता. शिंदखेडा) येथील गावशिवरात मंगळवारी (ता. १८) सायंकाळी सहाच्या सुमारास अवैध वाळू वाहतूक करताना एक ट्रॅक्टर तहसीलदारांना सापडले. मात्र ट्रॅक्टर मालक, चालक व एक जणाने तहसीलदारसह शासकीय वाहनचालकाला धक्काबुक्की करून ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले.

म्हणून मंगळवारी रात्री उशिरा नरडाणा पोलिस ठाण्यात वाळूचोरी, शासकीय कामात अडथळा आदी कलमान्वये म्हळसर (ता. शिंदखेडा) येथील तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला. (person pushed government vehicle driver and tehsildar took away tractor Dhule Crime News)

शिंदखेडा येथील तहसीलदार ज्ञानेश्वर सपकाळे (वय ४२) व चालक महादेव पवार मंगळवारी सायंकाळी सहाच्या सुमारास शासकीय वाहनाने जात असताना अवैध वाळू उत्खनन व अवैध वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली होती.

पाष्टे ते म्हळसर रस्त्यावर म्हळसरकडून येणाऱ्या विनाक्रमांकाच्या निळ्या रंगाच्या ट्रॅक्टरवरून चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचालकास थांबण्याचा इशारा देऊनसुद्धा तो न थांबवता पळून घेऊन गेला व त्याचा पाठलाग करून त्याचे नाव-गाव विचारले असता त्याने राहुल सुरेश कोळी (रा. म्हळसर) असे सांगितले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

ट्रॅक्टर नरडाणा पोलिस ठाण्यात घेण्यास सांगितल्याने त्याने ट्रॉलीमधील वाळू उपसून पळू लागल्याने त्यास शासकीय वाहनचालक महादेव पवार थांबवत असताना त्यास ट्रॅक्टरमालक मनोज जाधव (रा. म्हळसर) याने धक्काबुक्की करून मातीत फेकून दिले. तहसीलदार सपकाळे यांनी जाधव यास ट्रॅक्टर आणण्यास सांगितले असता त्याने धक्काबुक्की केली.

तुषार शालीक कोळी (रा. म्हळसर) यानेसुद्धा धक्काबुक्की केली व बळजबरीने ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले, अशी फिर्याद तहसीलदार सपकाळे यांनी नरडाणा पोलिस ठाण्यात दिल्यावरून राहुल सुरेश कोळी, मनोज सुभाष जाधव व तुषार शालीक कोळी (तिन्ही रा. म्हळसर) यांच्याविरोधात वाळूचोरीचा, शासकीय कामात अडथळा, धक्काबुक्कीचा व गौण खनिज अॅक्टनुसार गुन्हा दाखल झाला असून, पुढील तपास उपनिरीक्षक कुंवर करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Accident : आषाढी वारीत दुर्दैवी घटना! जेजुरीजवळ ट्रकची वारकऱ्यांना धडक, ३ महिलांचा मृत्यू, ४ गंभीर जखमी

Ashadhi Wari: पंढरपुरात सायकलवारीचा जल्लोष! महाराष्ट्र-कर्नाटकातील ४ हजार सायकलस्वारांची हरिनामाच्या गजरात नगरप्रदक्षिणा

Nagpur: विक्रेत्याच्या चुकीची शिक्षा आता खरेदीदाराला नाही; जीएसटीच्या नियमांमध्ये होणार बदल

Latest Marathi News Live Update : जेजुरीजवळ ट्रकच्या धडकेत तीन महिला वारकऱ्यांचा मृत्यू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी रुग्णालयात जाऊन जखमींची केली विचारपूस

Petrol-Diesel Price Today: अमेरिका-इराण संघर्षानंतर देशात इंधनाचे नवे दर जाहीर! 13 जुलैला पेट्रोल-डिझेल किती रुपयांना?

SCROLL FOR NEXT