Pick up overturns 22 labourers injured in accident on Thalner Borkheda road Dhule Accident News  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Accident News : पिक-अप उलटून 22 मजूर जखमी; थाळनेर-भोरखेडा रस्त्यावर अपघात

सकाळ वृत्तसेवा

Dhule Accident News : मजुरांना शेतात घेऊन जाणारी पिक-अप उलटून २२ मजूर जखमी झाले. हा अपघात सोमवारी (ता. १४) थाळनेर-भोरखेडा रस्त्यावर घडला.

जखमींमध्ये २१ महिला व एका पुरुषाचा समावेश आहे. त्यातील १४ जणांना प्राथमिक उपचारानंतर धुळे जिल्हा रुग्णालयात रवाना करण्यात आले. (Pick up overturns 22 labourers injured in accident on Thalner Borkheda road Dhule Accident News )

भोरखेडा परिसरात शेतीकामासाठी मजुरांना घेऊन जाणारी पिक-अप (एमएच १८, बीझेड ०१६७) सकाळी आठला अचानक उलटली. अपघातात दबले जाऊन मजुरांनी किंकाळ्या फोडल्या. त्या ऐकून परिसरातील शेतकरी व ये-जा करणारे वाहनचालक थांबले. त्यांनी जखमींना तातडीने थाळनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले.

थाळनेर येथे प्रथमोपचार केल्यानंतर आवश्यकतेनुसार १४ महिलांना धुळे येथे रवाना करण्यात आले. पाऊस पडल्याने रस्ता निसरडा झाला होता. त्यावर ब्रेक न लागल्याने हा अपघात घडल्याचे प्रथमदर्शनी कळते. अपघाताची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते. दरम्यान, थाळनेर येथील लोकप्रतिनिधींनी रुग्णालयात भेट देऊन महिलांची विचारपूस केली.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

जखमींमध्ये सुनंदाबाई भरत मराठे, विमलबाई बळिराम मराठे, प्रियंका सुकलाल कोळी, प्रमिलाबाई भिका मराठे, अलकाबाई महेश सावळे, अनिताबाई अरविंद सावळे, छायाबाई बापू वाडिले, संगीता गुलाब कोळी, सरलाबाई सुभाष मराठे, वर्षा भगवान कोळी, राजेंद्र शांताराम शिरसाट, सपना किरण शिरसाट, नंदिनी सुकलाल कोळी, चंदनबाई पुंडलिक कोळी, वंदना दीपक शिरसाट, लताबाई देवराम पानसरे, निंबाबाई बन्सीलाल कोळी, कविताबाई गुलाब कोळी, ज्योती छोटू बडगुजर, चंद्रभागाबाई आधार मराठे, प्रतिभा प्रवीण सावळे, सुनीता सुकलाल कोळी (सर्व रा. थाळनेर) यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India suspends postal service to US: भारताने घेतला मोठा निर्णय! आता अमेरिकेसाठी ‘पोस्टल सर्विस’ बंद

National Space Day : भारताची भविष्यातली अंतराळ झेप कशी असेल? इस्रोच्या महत्वाकांक्षी मोहिमांची A टू Z माहिती, वाचा एका क्लिकवर

Latest Marathi News Updates : मनोज जरांगे यांच्या मुंबई आंदोलनाच्या तयारीसाठी आज जालन्यात मराठा समाजाची महत्वाची बैठक

BEST Bus: गणेशोत्सवासाठी बेस्टची मोठी घोषणा, रात्री चालणार विशेष गाड्या; कधी आणि कुठे? जाणून घ्या

ODI World Cup 2027 साठी ठिकाणं ठरली! 'या' शहरांमध्ये खेळवले जाणार सामने

SCROLL FOR NEXT