Excavation work in progress for pipe laying in new colony. Pipelines buried in the second photo. esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar News : हातोडा तापी पाणीपुरवठा योजना; तळोद्यात पाइपलाइन टाकण्याच्या कामाला वेग

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar News : शहराचे दोन भागांत विभाजन करून झोन क्रमांक १ व झोन क्रमांक २ असे भाग करून हातोडा तापी पाणीपुरवठा प्रकल्पाच्या कामात शहराला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन पालिकेने आखले आहे.

त्याअंतर्गत पाणीपुरवठा करण्यासाठी शहरात पाइपलाइन टाकण्याच्या कामाने वेग घेतला आहे. (pipeline work started in taloda nandurbar news)

त्यात तापी नदीचे पाणी शहरात आणण्यासाठी नदीतील जॅकवेल ते पाणीपुरवठा केंद्रापर्यंत पाणी आणणे महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. त्यामुळे हातोडा तापी पाणीपुरवठा योजनेच्या कामात शहरात उत्सुकता वाढली आहे.

शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या अमृत दोन अभियानांतर्गत वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाला गती आली आहे. या योजनेच्या कामासाठी २९ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर झाला आहे. यासाठी आमदार राजेश पाडवी व माजी नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या प्रयत्नाने निधी मिळाला आहे. त्यामुळे सध्या या योजनेच्या कामाला प्रत्यक्षात सुरवात झाली आहे. सांगली येथील सह्याद्री कन्स्ट्रक्शन कंपनीला कामाचा ठेका देण्यात आला आहे.

कंपनीने नवीन वसाहती भागात पाइपलाइन टाकण्याचे काम सुरू केले आहे. याअंतर्गत सर्व नवीन वसाहतींमध्ये रोड खोदून सुमारे साडेतीन फूट खोल चारी करून चार इंची पाइप टाकला जात आहे. सध्या केवळ पाइप टाकण्याचे काम सुरू असून, घरांना कनेक्शन देण्याचे काम नंतर केले जाणार असल्याचे ठेकेदार कंपनीने सांगितले. दुसरीकडे शहरात १४ लाख लिटर पाण्याची टाकी मागील अनेक वर्षांपासून बनून तयार आहे. ती पाणीपुरवठा केंद्राजवळच आहे.

दुसऱ्या साडेसात लाख लिटर पाण्याच्या टाकीचे काम सुरू होणार आहे. पालिकेने दोन्ही पाण्याच्या टाक्यांवरून शहराचे दोन झोन बनवून पाणीपुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. त्यात जुने शहर व नवीन वसाहती अशी विभागणी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यात सध्याच्या घडीला भूगर्भातील पाण्यावर अवलंबून असलेला तळोदा शहराचा पाणीपुरवठा भविष्यात तापी नदीच्या पाण्यावर होणार असल्याने शहरातील नागरिकांना तापी नदीचे पाणी शहरात येण्याची उत्सुकता लागली आहे.

नागरिकांचे कामाकडे लक्ष

पाइपलाइन टाकण्यासाठी नवीन वसाहतींमध्ये नव्यानेच तयार केलेले रस्ते खोदावे लागत आहेत. त्यात काही ठिकाणी खडी-मुरमाचे रस्ते आहेत, तर अनेक ठिकाणी काँक्रिटीकरणदेखील झाले आहे. त्यात आता केवळ पाइप टाकले जात आहेत. घरांना कनेक्शन देतेवेळी प्रत्येक घरापर्यंत पुन्हा खोदकाम करावे लागणार आहे.

त्यात तापी नदीतून पाणी शहरात आणणे व जलशुद्धीकरण प्रकल्प सुरू करणे हे महत्त्वाचे टप्पे असणार आहेत. मात्र सध्या खोदकामच सुरू असल्याने रस्त्यांची चाळण होणार आहे. त्यामुळे नागरिकांचे या कामाकडे लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT