CCTV  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : पोलिसांचा तिसरा डोळाही ठरेल ‘विघ्नहर्ता’! ‘एक कॅमेरा पोलिसां’साठी उपक्रमात लोकसहभागाचे आवाहन

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांचा तिसरा डोळा समजला जाणारा सीसीटीव्ही कॅमेऱ्याही ‘विघ्नहर्ता’ ठरू शकतो. त्यासाठी दुकानदारांसह विविध घटकांनी ‘देशाची सुरक्षा माझी सचोटी, एक कॅमेरा पोलिसांसाठी’ या उपक्रमांतर्गत सहभाग नोंदवावा, असे पोलिस दलाचे आवाहन आहे. या अनुषंगाने येथील बैठकीत व्यापारी महासंघाने सहभाग नोंदवीत शहरात ठिकठिकाणी पाचशे सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा स्वागतार्ह निर्णय जाहीर केला.

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. बी. जी. शेखर पाटील यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे. या अनुषंगाने त्यांच्या उपस्थितीत जिल्हा पोलिस दल व धुळे व्यापारी महासंघातर्फे केमिस्ट भवनात कार्यक्रम झाला.

गुन्हेगारी नियंत्रणासाठी पोलिसांकडून सातत्याने वेगवेगळ्या कारवाया होत असतात. (police appeal to public participation in initiatives for One Camera Police dhule news)

त्यात गुन्हेगारांवर आणखी वचक निर्माण व्हावा यासाठी लोकसहभाग वाढीचा प्रयत्न पोलिसांकडून सुरू आहे. या उपक्रमास नागरिकांनी प्रतिसाद दिला तर कायदा- सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मोलाची मदत होणार आहे. त्यामुळे पोलिसांनी या उपक्रमाविषयी प्रबोधन सुरू केले आहे.

कॅमेरा लावा, सुरक्षित राहा

सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या मदतीने गुन्हेगारांचा माग काढण्यासाठी पोलिसांना मदत तर होईलच, शिवाय स्वसुरक्षिततेचा हेतू साध्य होऊ शकेल. तसेच या उपक्रमामुळे काही प्रसंगी निरपराध व्यक्तीवरील अन्याय टळू शकतो, असे श्री. शेखर पाटील यांनी सांगितले. नंतर जिल्हा पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांनी शहरातील कायदा व सुव्यवस्थेत सीसीटीव्ही कॅमेरा कसा सहयोगी असतो याविषयी माहिती दिली.

अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी या उपक्रमाविषयी सविस्तर माहिती दिली. व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग, सराफ असोसिएशनचे अजय नाशिककर, केमिस्ट असोसिएशनचे राजेश गिंदोडिया यांनी मनोगत व्यक्त केले.

नागरिकांना आवाहन

लोकसहभागातून निवासस्थानांसह ठिकठिकाणी, रस्त्यावरील दुतर्फा आस्थापनांच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास चेन स्नॅचिंग, चोरी, घरफोडी, महिलांची छेडखानी, टवाळखोरी आदींना आळा, तर अपघाताबाबत माहिती समोर येऊ शकेल. अनेक गैरप्रकारांना चाप, गुन्हेगारांना वचक बसू शकेल. जनता भयमुक्त राहू शकेल.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

त्यामुळे दुकानदारांसह नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने एक कॅमेरा पोलिसांसाठी या उपक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन आयजींसह श्री. बारकुंड, श्री. काळे यांनी केले. पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे, एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, आझादनगरचे निरीक्षक नितीन देशमुख, निरीक्षक आनंद कोकरे, तसेच व्यापारी साबीर शेख, भीमजी पटेल, अनिल कटारिया, किशोर डियालानी, गोपाल माने, प्रवीण रेलन, सुनील रुणवाल, अनिल चौधरी, मंदार महाजन, सुभाष कोटचा, दीपक भावसार आदी उपस्थित होते.

व्यापारी महासंघातर्फे ५०० कॅमेरे

व्यापारी महासंघातर्फे आतापर्यंत फुलवाला चौक ते गांधी पुतळ्यापर्यंत दुतर्फा ४४ कॅमेरे लावण्यात आले आहेत. महिन्याभरात शहरात आग्रा रोडसह ठिकठिकाणी दुकानदार, व्यावसायिक मिळून पाचशे कॅमेरे लावतील, अशी हमी श्री. बंग, श्री. गिंदोडिया यांनी दिली. पोलिसांच्या या उपक्रमास व्यापारी महासंघ, सराफ असोसिएशन तसेच सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांनी सकारात्मक प्रतिसाद दिला. डॉ. शेखर पाटील, श्री. बारकुंड यांच्या उपस्थितीत कॅमेऱ्यास लावण्यासाठी दिल्या जाणाऱ्या स्टिकरचे प्रकाशन झाले.

धुळे जिल्ह्यात ७२९ कॅमेरे कार्यान्वित

लोकसहभागतून नाशिक परिक्षेत्रात आतापर्यंत तीन हजार ७०० कॅमेरे बसविण्यात आले असून, तीन हजार ७०१ व्या कॅमेऱ्यांचे येथील बंग एजन्सीत डॉ. शेखर पाटील यांच्या हस्ते उद्‌घाटन झाले. तसेच धुळे जिल्ह्यात २५१ ठिकाणी आतापर्यंत ७२९ कॅमेरे बसविण्यात आले आहेत, असे श्री. बारकुंड, श्री. काळे यांनी सांगितले.

नाशिक परिक्षेत्रात झालेल्या आवाहनानंतर व्यापारीबांधवांनी दिलेल्या प्रतिसादामुळे आतापर्यंत अप्रत्यक्षरीत्या शासनाच्या सरासरी ७० कोटींच्या निधीची बचत झाल्याची माहिती आयजी डॉ. शेखर पाटील यांनी दिली..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ज्येष्ठ नागरिक आक्रमक! 'डीजेमुक्त सोलापूरसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा'; डीजेग्रस्तांचा आवाज जिल्हाधिकारी, पोलिस आयुक्तांच्या कानावर

Vice President Election 2025 : बहुमत नाही म्हणून एनडीएची विरोधी पक्षांना मतदानाची विनंती; उद्धव ठाकरेंच्या खासदाराचा दावा

Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मिरची होती का? जेवणात काय झणझणीत वापरत होते?

Bail Pola Festival 2025: आज आवतण घ्या, उद्या जेवायला या; खांदेमळणीने सुरू होणार कृषी संस्कृतीचा उत्सव बैलपोळा

Panchganga River : पंचगंगा नदी धोका पातळीपासून ३ इंच दूर; बावडा-शिये मार्ग बंद, नदीकाठी सतर्कतेचा इशारा, 'या' मार्गांवर वाहतूक बंद

SCROLL FOR NEXT