Road-Romeo-in nashik.jpg 
उत्तर महाराष्ट्र

चलती है क्या ?'तिला रिक्षात बसण्याचा इशारा केला..अन् त्यावेळीच...

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : नाशिक रोड बसस्थानक परिसरात बुधवारी (ता. 25) रात्री दहा ते बारादरम्यान, पोलिस आयुक्तालयाच्या निर्भया पथक-4 च्या महिला पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सापळा रचला.

अशी घडली घटना..

एक महिला पोलिस साध्या वेशात नाशिक रोड बसस्थानकात थांबल्या होत्या. त्या वेळी संशयित दीपक जगताप त्यांच्या दिशेने आला आणि जवळ येऊन त्याने रिक्षाथांब्याकडे येण्याचा इशारा केला आणि "चालते का?' असे म्हणत अश्‍लील हावभाव केले. त्या वेळी साध्या वेशात असलेल्या निर्भया पथक व नाशिक रोड पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले. या प्रकारचे व्हिडिओ रेकॉर्डिंगही करण्यात आले आहे. संशयित दीपक याच्याविरोधात नाशिक रोड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात येऊन अटक करण्यात आली. ही कामगिरी निर्भया पथकाच्या महिला उपनिरीक्षक श्रद्धा गंधास, महिला पोलिस प्रेरणा शेळके, कैलास पवार, मच्छिंद्र जाधव यांच्यासह नाशिक रोड पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी बजावली

अश्लील हावभाव त्यालाच नडले...

दोन दिवसांपासून पोलिस आयुक्तालयाच्या निर्भया पथकातील महिला अधिकाऱ्यांकडून रात्रीच्या वेळी बसस्थानक परिसरात छेडखानी करणाऱ्या "स्थानकसख्यां'ना बेड्या ठोकल्या असता, त्यात आणखी एकाची भर पडली आहे. नाशिक रोड बसस्थानकावर 42 वर्षीय "स्थानकसख्या'ला अटक करण्यात येऊन नाशिक रोड पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला. दीपक गुलाबराव जगताप (42, रा. पौर्णिमा बसस्टॉपच्या मागे, द्वारका) असे संशयित "स्थानकसख्या'चे नाव आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT