Police arrested Sellers of liquor stolen from Jamner Jalgaon News esakal
उत्तर महाराष्ट्र

जामनेरातून चोरलेल्या दारूची जळगावात विक्री

रईस शेख

जळगाव : गाडेगाव नेरी (ता. जामनेर) येथील एका हॉटेलातून चोरलेल्या देशी-विदेशी दारू (liquor) विक्रीच्या प्रयत्नात असलेल्या दोन संशयितांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली व त्यांनी चोरी केलेला काही माल जप्त केला आला असून, त्यांचे तीन साथीदार फरारी झाले आहेत.
गाडेगाव नेरी येथील हॉटेल शशीप्रभा फोडून १ लाख १० हजार २२५ रुपयांची देशी-विदेशी दारू चोरून नेली होती. हॉटेलचा मॅनेजर शिवाजी पवार यांच्या तक्रारीवरून जामनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

पोलिस निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या शोध पथकातील सहायक फौजदार अतुल वंजारी, किशोर पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील, सचिन पाटील यांनी चोरीची दारू विक्रीच्या प्रयत्नातील दिनकर ऊर्फ पिण्या रोहिदास चव्हाण (वय २२, रा. मच्छी मार्केट, सुप्रिम कॉलनी), सागर लक्ष्मण वाधवाणी (२०, रा. बाबानगर) यांना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखविताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. त्यांच्या ताब्यातून ५४ हजार ५६७ रुपयांची देशी विदेशी दारू ताब्यात घेतली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेत 65 हजार शेतकरी पात्र; 35 हजार जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

Mumbai News: १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढले एक किलो चुंबक, डॉक्टरांनी वाचवला जीव; गंभीर आजाराने ग्रस्त

Latest Marathi News Live Update : विद्यार्थ्यांनी माफी न मागता माफ कसं करता? संजय राऊत

पंतप्रधान १०० टक्के योग्यच, पण दुसऱ्यांनाही आया असतात; १२ वर्षे तुमच्या लोकांनी केलं त्याची माफी कोण मागणार, राज ठाकरेंचा सवाल

Nashik Municipal Corporation : 'लोकांच्या असंतोषाची परीक्षा पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे'; मंत्री छगन भुजबळ यांनी कोणावर साधला निशाणा?

SCROLL FOR NEXT