Police meeting esakal
उत्तर महाराष्ट्र

DJचा आवाज रात्री 9 नंतर नकोच! पोलिसांकडून सक्त ताकीद

रात्री नऊ वाजेनंतर डीजेचा आवाज बंद झाला पाहिजे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी डीजे चालक-मालक संघटनांना दिला आहे.

सकाळ वृत्तसेवा

धुळे : रात्री नऊ वाजेनंतर डीजेचा आवाज बंद झाला पाहिजे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी डीजे चालक-मालक संघटनांना दिला आहे. तसेच धार्मिक स्थळाजवळही डिजे वाजविण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे.

लग्न, वाढदिवस आदी विविध कार्यक्रमांच्या निमित्ताने रात्री उशिरापर्यंत कानठळ्या बसविणाऱ्या डीजेचा आवाज त्या-त्या भागातील नागरिकांना मोठीच डोकेदुखी असते. विशेषतः रात्री झोपेच्या वेळी हा आवाज बंदच होत नाही त्यामुळे मोठा वैताग असतो. दरम्यान, आता पोलिस प्रशासनाने डिजेच्या अनुषंगाने नियमांचे काटेकोर पालन होण्याच्या अनुषंगाने पावले उचलली आहेत. धुळे शहर पोलिस ठाण्याच्या आवारात नुकतीच डिजे चालक-मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. पोलिस निरीक्षक नितीन देशमुख, आझादनगरचे पोलिस निरीक्षक आनंद कोकरे, देवपूर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मोतीलाल निकम आदी उपस्थित होते. बैठकीत डीजेचालकांना पोलिस अधिकाऱ्यांनी विविध सूचना केल्या.

मंदिर तसेच धार्मिकस्थळाजवळ डीजे वाजवू नये, आक्षेपार्ह गाणी वाजवू नयेत. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या नियमानुसारच डीजेचा वापर व्हावा अशा अशा सूचना दिल्या. सध्या लग्नसराईमुळे अनेक वसाहतींमध्ये हळदीच्या कार्यक्रमात रात्री उशिरापर्यंत डीजेचा आवाज घुमतो. त्याचा त्रास परिसरातील नागरिकांना होतो. त्याचबरोबर डीजेवर गाणे लावण्यावरुनदेखील वाद होतात. आक्षेपार्ह गाण्यांमुळे सामाजिक सलोखा बिघडण्याची शक्यता असते. या पार्श्‍वभूमीवरही नियमांचे पालन केले नाही, तर कठोर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिस अधिकाऱ्यांनी डिजे चालक-मालकांना दिल्या. या निर्णयामुळे नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. अर्थात पोलिसांनी दिलेल्या या सूचनांचे किती पालन होते, नियम मोडणाऱ्यांवर काय कारवाई होते त्यावरच सर्वकाही अवलंबून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT