Superintendent of Police Praveen Kumar Patil while showing the seized bike.
Superintendent of Police Praveen Kumar Patil while showing the seized bike. esakal
उत्तर महाराष्ट्र

सख्खे शेजारी, पक्के चोर : पोलिसांनी केल्या 15 दुचाकी हस्तगत

सकाळ वृत्तसेवा

शिरपूर (जि. धुळे) : दोघांच्या गावाची हद्द एकच, गावांची नावेही सारखीच! त्यामुळेच की काय, दोघांनी धंदाही एकच निवडला. दुचाकी चोरायच्या आणि विकायच्या. उमलत्या वयात एकामागे एक गुन्ह्यांचे विक्रम रचत असताना, त्यांना शिरपूर शहर पोलिस ठाण्याच्या शोध पथकाने चतुर्भूज केले. त्यांच्याकडून तब्बल १५ महागड्या दुचाकी जप्त करण्यात आल्या. या कामगिरीबद्दल पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी शिरपूरला येऊन पोलिसांचे अभिनंदन केले.

भोईटी (ता. शिरपूर) जवळचा बोरमळीपाडा येथील रहिवासी दत्तू तथा दीपककुमार पावरा (वय २३) व चोपडा तालुक्यातील मेलानाजवळचे बोरमळी येथील रहिवासी चुनिलाल तथा गणेश भोल्या पावरा (वय २०) यांना शहर पोलिसांनी करवंद नाका परिसरातून दुचाकी चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतले. १४ सप्टेंबरला दोघांनी शहरातील भंडारी सिनेमागृहाजवळ किशोर शिवदास भिल (रा. नवी सांगवी, ता. शिरपूर) याची दुचाकी लंपास केली होती. दोघांबाबत तपास करताना ते अट्टल चोर असल्याची माहिती मिळाली. (Police seized 15 bikes stolen by neighbours Dhule Crime News)

गुंट्यावर १४ गुन्हे

चुनिलाल तथा गणेश याला गुन्हे विश्वात गुंट्या नावाने ओळखले जाते. तो कसलेला चोर असून, जळगाव जिल्ह्यात त्याच्यावर दुचाकी चोरीचे तब्बल १४ गुन्हे दाखल असल्याची माहिती शोध पथकाला मिळाली. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास करीत दोघांकडून चोऱ्यांची कबुली घेतली. त्यात जळगाव व शिरपूर येथून १५ दुचाकी चोरी केल्याचे त्यांनी सांगितले. पोलिसांनी दोन दिवसांत अथक प्रवास करीत वेगवेगळ्या ठिकाणाहून १५ दुचाकी जप्त केल्या. हिरो, होंडा शाईन, बजाज पल्सर, अशा महागड्या दुचाकींचा त्यात समावेश असून, एकूण आठ लाख ३० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. त्यातील सात दुचाकींच्या मालकांचा शोध लागला असून, संबंधितांशी संपर्क साधण्यात पोलिसांना यश मिळाले. उर्वरित दुचाकीही मूळ मालकांच्या सुपूर्द करण्यात येणार आहेत.

पोलिस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी गुरुवारी (ता. २२) शिरपूरला भेट देऊन निरीक्षक रवींद्र देशमुख व शोध पथकाचे अभिनंदन केले. दुचाकी चोरीचे गुन्हे रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची संख्या वाढविणे आवश्यक असून, सार्वजनिक स्थळावरील आस्थापनांच्या मदतीने त्या कामाला गती द्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या. पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथकाचे हवालदार ललित पाटील, गोविंद कोळी, विनोद अखडमल, प्रवीण गोसावी, मुकेश पावरा, प्रशांत पवार, होमगार्ड मिथुन पवार, चेतन भावसार, राम भिल, शरद पारधी यांनी ही कामगिरी बजावली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Nirupam : ''माझी घरवापसी होतेय, तीस वर्षांनंतर पुन्हा शिवसेनेत...'', संजय निरुपम यांचा पक्षप्रवेश ठरला

AstraZeneca Covid Vaccine Side Effects: किती ट्रायल घेतल्यानंतर कोविशील्ड लसीला मंजूरी मिळाली? आता का होतायत आरोप?

Smart TV Tips : Smart TV सतत बंद पडते, सिग्नल जातो तर घरीच करा ठिक, या टिप्स वापरून पहा

Latest Marathi News Live Update: शिवरायांचं 'ते' वाघनखं महाराष्ट्रात येणं लांबलं

Satara News : आमदार मकरंद पाटील उदयनराजेंच्या प्रचारात दिसत नाहीत; शंभूराज देसाईनी सांगितलं हे कारण

SCROLL FOR NEXT