Damage to Deputy Superintendent of Police's vehicle.  esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule Riot News : हिंसक जमावाकडून पोलिस लक्ष्य; निरीक्षक खलाणेंच्या डोक्यात मोठा दगड टाकण्याचा प्रयत्न

सकाळ वृत्तसेवा

Dhule Riot News : सांगवी (ता. शिरपूर) येथील दंगल शमविण्यासाठी पोचलेल्या पोलिसांनाच दंगलखोरांनी लक्ष्य केले. त्यांच्यावर दगडांचा तुफान मारा करण्यात आला. त्यात जिल्ह्यातील पाच अधिकारी आणि १७ कर्मचारी जखमी झाले.

दंगलीचे वृत्त कळताच सांगवी पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोचले. मात्र, वातावरणाचा रागरंग पाहून सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांनी पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांना माहिती दिली. (police were pelted with stones in sangvi shirpur Dhule Riots News)

त्यांनी जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांची कुमक सांगवीत मदतीला पाठविली. एव्हाना जमावातील दंगलखोरांची संख्या दोन हजारांवर पोचली होती. विविध दिशांतून दगड पोलिसांवर भिरकावले जात होते.

मोठ्या दगडाचा वापर

सांगवीचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांच्या डोक्यातच मोठा दगड घालण्याचा प्रयत्न जमावातील संशयितांनी केला. सुदैवाने खलाणे यांनी डोक्यात हेल्मेट घातल्याने ते बचावले. मात्र, दगड त्यांच्या मानेवर लागून ते जखमी झाले.

त्यांच्यासह दोंडाईचाचे पोलिस निरीक्षक श्रीराम पवार, थाळनेरचे सहाय्यक निरीक्षक दीपक पावरा, सोनगीरचे सहाय्यक निरीक्षक गणेश फड, महामार्ग सुरक्षापथकाचे उपनिरीक्षक नरेंद्र पवार, पोलिस नाईक संदीप ठाकरे, वाहनचालक कैलास ढोले, पोलिस नाईक रवींद्र राठोड, जयेश भागवत, मुख्तार शहा, विशाल लोंढे, प्रवीण अमृतकर, संजय गुजराथी, सहाय्यक उपनिरीक्षक विजयसिंह पाटील, हवालदार संजय जाधव, मनोज नेरकर, पंकज ठाकूर, गोविंद कोळी, संदीप ठाकरे, विजय पाटील, निखिल काटकर, भूषण वाडिले दगडफेकीत जखमी झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

शासकीय वाहनांची मोडतोड

जमावाच्या दगडफेकीत शासकीय वाहनांचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. पोलिस हे दंगल शमवण्यात गुंतल्याची संधी साधून स्टेपनी, वायरलेस सेटदेखील चोरीस गेले.

दंगलीत उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांचे वाहन (एमएच १८, बीएक्स ०२२०), एलसीबीचे वाहन (एमएच १२, आरवाय ७४११, एमएच १८ बीआर ५४१५ व एमएच १८ बीसी ०४५८), थाळनेर पोलिस ठाण्याचे वाहन (एमएच १८, बीएक्स ०२२६), धुळे शहर वाहतूक शाखेचे वाहन (एमएच १८, बीएक्स ०२३५), महामार्ग सुरक्षापथकाच्या शासकीय वाहनावरील डायल ११२ एमडीटी संच, स्टेपनी जॅक, लॉगबुक व बॅटरी, शिरपूर पोलिसांचे वाहन (एमएच १८, बीएक्स ०२१७ व एमएच १८, बीआर ५४२२), सोनगीर पोलिसांचे वाहन (एमएच १८, बीएक्स ०२१५), शिंदखेडा पोलिस वाहनाचे (एमएच १८, बीएक्स ०२१७) नुकसान झाले. तहसीलदार महेंद्र माळी यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली. त्यात चालक आरिफ पठाण जखमी झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT