Kishore Kale taking a parade of 67 history sheeters at the Superintendent of Police office esakal
उत्तर महाराष्ट्र

Dhule News : धुळ्यात 67 ‘हिस्ट्रिशीटर्स’ची परेड; पोलिसांनी कायदा न मोडण्याची दिली शपथ

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. ८) सकाळी पोलिस मुख्यालयाच्या आवारात गुन्हेगार, संशयित, समाजकंटकांची हजेरी घेण्यात आली.

सकाळ वृत्तसेवा

Dhule News : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी (ता. ८) सकाळी पोलिस मुख्यालयाच्या आवारात गुन्हेगार, संशयित, समाजकंटकांची हजेरी घेण्यात आली. अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या देखरेखीत ६७ ‘हिस्ट्रिशीटर्स’ची परेड झाली.

यात श्री. काळे यांनी ‘हिस्ट्रिशीटर्स’ना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. त्यांना कायदा न मोडण्याची शपथ देत तशी लेखी हमी घेतली. (Presence of suspected criminals in the police headquarters premises for the upcoming Lok Sabha elections dhule news)

जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही परेड झाली. ‘एलसीबी’चे पोलिस निरीक्षक दत्तात्रय शिंदे, पोलिस निरीक्षक प्रमोद पाटील, शशिकांत पाटील, संदीप पाटील यांच्यासह अन्य पोलिस अधिकारी उपस्थित होते.

एकाला शिक्षा

पोलिस दलाची सूचना हसण्यावारी नेणाऱ्या एकाला सर्वांदेखत ‘कोंबडा’ बैठकीची शिक्षा सुनावत तंबी देण्यात आली. सूचना हसण्यावारी नेऊन कायदा मोडाल तर गाठ आमच्याशी आहे, असा इशारा श्री. काळे यांनी दिला.

शांततेचे पालन करावे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याकामी पोलिसांना सहकार्य करावे. कुठल्याही स्थितीत दादागिरी चालणार नाही, सोशल मीडियावर धमकावणारे रिल्स, प्रक्षोभक मजकूर पोस्ट करू नये, अन्यथा कारवाई होईल, असा इशारा परेडवेळी देण्यात आला.

पोलिसयंत्रणा सतर्क

छत्रपती शिवाजी महाराज जयंती, आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीमुळे जिल्हा पोलिस यंत्रणा सतर्क आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले, ‘हिस्ट्रिशीटर्स’, तसेच अट्टल गुन्हेगारांना संबंधित पोलिस ठाण्यांमध्ये हजेरी द्यावी लागणार आहे, तशी सूचना पोलिस अधीक्षक धिवरे यांनी दिली. लोकसभा निवडणूक निर्भय वातावरणात व्हावी यासाठी गृह विभागाने पोलिस दलास विशेष सूचना केली आहे.

पोलिस अधीक्षक धिवरे यांच्या आदेशानंतर पोलिसांनी हल्लेखोर, टोळीयुद्ध करणारे, निवडणुकांमध्ये व्यत्यय आणणाऱ्यांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यात तीन वर्षांपासून पोलिसांच्या अधिकार क्षेत्रातील शारीरिक दुखापत करणारे आरोपी, जे निवडणुकीच्या कालावधीत कायदा हातात घेऊ शकतात असे आरोपी, संशयित, गुन्हेगार, समाजकंटक, मागील तीन वर्षांतील आरोपींचे गटातील वैरभाव आणि पूर्वी ८० व आता १४८ अशी संख्या झालेले हिस्ट्रिशीटर्स समाविष्ट आहेत.

संबंधितांवर प्रतिबंधात्मक कारवाई करणे, तंबी देणे यासह विविध प्रकारच्या कारवाया केल्या जात आहेत. याअंतर्गत जिल्ह्यातील १७ पोलिस ठाण्यांत बुधवारी (ता. ७) दोनशेवर गुन्हेगार, संशयित, समाजकंटकांची परेड घेऊन त्यांना सूचक तंबी देण्यात आली.

अशी दिली शपथ...

परेडवेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धिवरे यांनी स्वतः तयार केलेली शपथ हिस्ट्रिशीटर्सना देण्यात आली. ती अशी ः मी भारताच्या संविधानाचे व सर्व कायद्याचे पालन करेल. माझ्या हातून यापुढे एकही गुन्हा घडणार नाही. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होणार नाही, अशी मी ग्वाही देत आहे. मला पूर्ण कल्पना आहे.

की यापुढे माझ्या हातून कोणतेही गैरकृत्य घडले तर पोलिस प्रशासनाकडून कठोरात कठोर कारवाई केली जाईल. मी अशी शपथ घेत आहे, की कोणत्याही परिस्थितीत मी कायदा हातात घेणार नाही, कोणताही गुन्हा करणार नाही. एक चांगला नागरिक घडून दाखवेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uttar Pradesh :  कर विभागात फील्डवर ‘अशा’ अधिकाऱ्यांचीच करा भरती; CM योगी आदित्यनाथ यांनी दिले कडक आदेश

Uttrakhand : उत्तराखंडची ही ठिकाणं पहाल तर स्वित्झर्लंड विसरून जाल; हे पाच सुंदर लोकेशन्स एकदा पहायलाच हवेत

Crime News : जळगाव-अजिंठा रोडवर गोळीबार: कुसुंबा गावात ८ ते १० जणांच्या टोळक्याची दहशत; दुचाकी दगडांनी ठेचली

Malegaon Nagarpanchyat Election : माळेगाव नगराध्यक्ष पदाचा पहिला मान ओबीसी महिलेला

Santosh Deshmukh Case: ''आरोपींच्या विरोधात शब्दही न बोलणारे लोकप्रतिनिधी...'', धनंजय देशमुखांचा मुंडेंवर घणाघात

SCROLL FOR NEXT