Women molestation esakal
उत्तर महाराष्ट्र

जळगाव : मंदीरात पुजारीकडून महिलेचा विनयभंग

- रईस शेख

जळगाव : शाहूनगरातील तपस्वी हनुमान मंदिरात पूजेसाठी आलेल्या महिलेचा पुजाऱ्याने विनयभंग (Molestation) केला. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात रामबालकदास महाराजाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीत कुटुंबीयांसह वास्तव्यास असलेली विवाहिता मंदिरात पूजेसाठी गेली होती. तेथे नियुक्त पूजा करणारे महाराज त्या महिलेकडे वाईट नजरेने बघत होते. याबाबत त्या महिलेने पतीलाही अनेक वेळा सांगितले होते.

सोमवारी (ता. २) दुपारी चारच्या सुमारास ती महिला मंदिरात पूजा करण्यासाठी गेली असता, राम बालकदास महाराजाने त्या महिलेचा विनयभंग केला. याबाबत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिस ठाण्यात रामबालकदास महाराजाविरुद्ध विनयभंगाचा (Molestation) गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस उपनिरीक्षक सर्जेराव क्षीरसागर तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Politics : "नेत्याच्या निधनाबाबत सत्य समोर यावे; शांत राहणे नैतिकतेला शोभणारे नाही..." : आमदार अमोल मिटकरी

Mokhada News : मोखाड्यातील बालकांनी अनुभवले मंत्रालय, मंत्र्यांशी मारल्या दिलखुलास गप्पा; परिवर्तन संस्थेचा पुढाकार

Latest Marathi News Live Update : संजय राऊत यांनी डोळ्यावर पट्टी बांधली का हे पाहावे लागेल - संदीप देशपांडे

Parbhani Municipal Corporation: हिंदुत्वाचा बालेकिल्ला अन् महापौरपदी मुस्लिम चेहरा! परभणी महापालिकेत नेमकं काय घडलं?

अंडरवल्ड डॉन छोट्या राजनच्या सेलमध्ये राजपाल यादवची रवानगी; काय आहेत सुविधा? अभिनेत्याला कशी मिळतेय वागणूक

SCROLL FOR NEXT